जालना जिल्हा ऑनलाईन पिक विमा ऑनलाईन अर्ज jalna crop insurance application भरणे सुरु झालेले आहेत. जालना जिल्ह्यासाठी कोणती पिक विमा कंपनी निवडली गेली आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी कोणत्या पिकांसाठी पिक विमा काढू शकतात. त्या पिकांची यादी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
एवढेच नव्हे तर खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो, पिक पेरा प्रमाणपत्र डाउनलोड कसे आणि कोठून करावे या संदर्भातील माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत.
पिक विमा ऑनलाईन अर्ज सुरु
पिक विमा ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील पिकांचा पिक विमा काढून घ्यावा. जेणे करून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर लगेच तुम्हाला त्या संदर्भात पिक विमा मिळू शकेल.
मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी Jalna District Farmers रिलायन्स इन्सुरन्स कंपनी देण्यात आलेली होती.
पुढील लेख पण वाचा मिरची कांडप योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
या वर्षी म्हणजेच २०२२ रोजी एचडीएफसी इग्रो इन्सुरन्स कंपनी लिमिटेड मुंबई हि कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे. कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मुग, मका या पिकांसाठी शेतकर्यांना खरीप पिक विमा काढता येणार आहे. खाली एक चार्ट दिलेला आहे तो व्यवस्थित बघून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापला पिक विमा काढून घ्यावा.
पिक विमा ऑनलाईन अर्ज करा तरच मिळू शकेल नुकसान भरपाई
नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी जर त्यांनी शेतातील पिकांचा पिक विमा काढला तर त्यांना पिक नुकसानभरपाई मिळू शकते.
मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवाना पिक नुकसानभरपाई देखील मिळालेली होती.
शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडे नुकसानीचा क्लेम करता येतो. पिक नुकसानीच्या ७२ तासाच्या आत शेतकऱ्याला त्यांनी ज्या कंपनीचा पिक विमा काढलेला आहे त्या कंपनीला पिक नुकसानीची सूचना देणे गरजेचे असते.
७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीस कळविणे आवश्यक.
पिक नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीस नुकसानीची सूचना देणे गरजेचे असते यामध्ये खालील पद्धतीने शेतकरी त्यांची सूचना पाठवू शकतात.
- क्रॉप इन्सुरन्स ॲप्लिकेशन crop insurance application.
- कंपनीच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून कळविणे.
- तालुक्यातील पिक विमा कंपनीस पत्राद्वारे सूचना देणे
वरील पद्धतीने तुम्ही पिक विमा कंपनीस कळवू शकता. यांनतर जेंव्हा पिक विमा कंपनीस तुमच्या पिक विमा नुकसानीची सूचना प्राप्त होते त्यावेळेस कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी येतात.
पाहणी केल्यानंतर तुम्हाला पिक विमा रक्कम तुमच्या खात्यावर जमा केली जाते.
असा करा खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा पिक विमा अर्ज लवकरात लवकर सादर करावा crop insurance jalna district.
खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दोन पद्धतीचा वापर शेतकरी करू शकतात. एक म्हणजे गावातील किंवा गावाजवळील सीएससी सेंटरवर जावून पिक विमा अर्ज सादर करणे आणि दुसरा म्हणजे स्वत अर्ज सादर करणे.
सीएससी सेंटरवर जावून अर्ज दाखल करणे.
जालना जिल्ह्यामधील अनेक तालुक्यातील गावांमध्ये सीएससी सेंटर असतात jalna district csc centers. त्या ठिकाणी जावून तुम्ही खरीप पिक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
सीएससी सेंटरवरील VLE प्रशिक्षित असलामुळे ते अगदी बिनचूकपणे तुमचा अर्ज सादर करून देवू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जावे लागेल.
शेतकरी स्वतः करू शकतील अर्ज
शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन असेल किंवा त्यांच्या घरातील एखाद्या सदस्याकडे असेल अशा वेळी शेतकरी त्यांच्या मोबाईलचा उपयोग करून देखील हा पिक विमा अर्ज सादर करू शकतात.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये खूप कामे असतात किंवा त्यांना csc सेंटरवर जाण्यास वेळ नसतो अशावेळी शेतकरी स्वतः ऑनलाईन अर्ज कसा सादर करू शकतात.
खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
खरीप असो किंवा रब्बी असोत पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. ती खालीलप्रमाणे.
- आधार कार्ड.
- बँक पासबुक.
- ८ अ उतारा.
- ७/१२ उतारा.
- पिक पेरा स्वयं घोषणापत्र.
वरीलप्रमाणे कागदपत्रे पिक विमा ऑनलाईन अर्ज करतांना सोबत असणे गरजेचे आहे. खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज २०२२ सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ देण्यात आलेली आहे. पिक विमा भरण्यासाठी दिलेली अंतिम दिनांक वाढेल या आशेवर न बसता लवकरत लवकर शेतकऱ्यां त्यांचा खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करून द्यावा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.