ई मुद्रा लोन e mudra loan संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी देत आहोत जेणे करून जालना जिल्ह्यातील शेतकरी किंवा बेरोजगार तरुण या योजनेचा लाभ घेवू शकाल.
मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो. या संबधित प्रोसेस काय असते जाणून घेवूयात संपूर्ण माहिती. हि माहिती केवळ जालना जिल्ह्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
जालना जिल्ह्यातील बरेच शेतकरी मुद्रा लोन योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यास इच्छुक असल्याचे दिसत आहेत.
मुद्रा लोन योजना अंतर्गत मुख्यत: उद्योग व्यवसाय सुरु करण्यासठी मुद्रा लोन दिले जाते. यातून बेरोजगार तून त्यांच्या उद्योग व्यवसाय सुरु करू शकतात.
मुद्रा लोन अनेक बँकतर्फे दिले जाते आणि त्यांची थोडीशी पद्दत वेगळी सुद्धा असू शकते.
तुम्ही sbi ग्राहक असाल आणि मुद्रा लोनसाठी अर्ज करू इच्छित असाल तर लक्षात घ्या की मुद्रा लोनसाठी दोन प्रकारे अर्ज करता येतो.
- बँक शाखेत भेट देवून
- ऑनलाईन पद्धतीने
पुढील लेख पण वाचा samaj kalyan yojana jalna 2022 कर्ज योजना अर्ज सुरु.
ऑनलाईन अर्ज केल्यास मुद्रा लोन योजनेसाठी मिळू शकते ५० हजारापर्यंत लोन.
तुमच्या तालुक्याच्या किंवा जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जावून तुम्ही मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकता. परंतु जर तुम्हाला ऑनलाईन इ मुद्रा लोनसाठी अर्ज करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता.
इ मुद्रा लोन ऑनलाईन अर्ज केल्यास बँकेच्या नियमानुसार ५० हजार रुपयाचे लोन मिळते. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त लोन हवे असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधावा लागतो.
अनेक बँकेत मुद्रा लोन देण्याची सुविधा असते परंतु आज आपण sbi e mudra loan संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. sbi e mudra loan योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर कास्रावा लागतो.
पुढील योजनेची माहिती पण वाचा महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना असा करा अर्ज
मुद्रा लोन योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
अर्ज करण्याअगोदर हि योजना कोणासाठी आहे तसेच योजनेचे स्वरूप काय आहे ते समजावून घ्या.
- बेरोजगार तरुणांना लघु उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुद्रा लोन योजना राबविण्यात येते.
- इ मुद्रा कर्ज मिळविण्यासाठी कर्जदार sbi बँकेचा ६ महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा चालू किंवा बचत खातेदार असावा लागतो.
- एसबीआय बँकेतर्फे मुद्रा लोनसाठी जास्तीत जास्त १ लाख रुपये कर्ज दिले जाते.
- ५ वर्षे एवढा कर्जाचा कालावधी असतो.
- एसबीआय बँकेच्या मापदंडानुसार इ मुद्रा लोनसाठी ५० हजार रुपयांचे कर्ज लगेच दिले जावू शकते.
- ५० हजार रुपयांच्या वरील कर्ज हवे असेल तर बँकेशी संपर्क साधावा लागतो.
मुद्रा लोन योजना कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- बँक खात्याचे तपशील
- जो व्यवसाय किंवा उद्योग करू इच्छित असाल त्या संबधित संपूर्ण तपशील.
- बँकेशी आधार नंबर सलग्न असावा म्हणजेच लिंक असावा.
- जातीचे विवरण आवश्यक असेल.
- तुम्ह्या उद्योगाचे GSTN व उद्योग आधार तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करावे लागते.
- शॉप act देखील तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे.
- ओळख पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करायचा असेल आणि त्यासाठी तुम्ही आर्थिक दृष्ट्या असक्षम असाल तर हि योजना तुमच्यासाठी आहे.
बेरोजगार तरुणांना या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग उभारून उदयोजक बनण्याची नवीन संधी निर्माण होते.
पंतप्रधान मुद्रा योजना किंवा पीएमएमवाय PMMY ही सूक्ष्म व लघु उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी भारत सरकारची योजना आहे.
मुद्रा लोन योजना फायदे
- मुद्रा लोन मध्ये कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत, हा या योजनेचा मुख्य फायदा आहे. मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत सुविधा प्रदान करते.
- या योजने अंतर्गत विस्तारित पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर-फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात. म्हणून, कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकतात.
- मुद्रा कर्जाची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
तीन प्रकारची मुद्रा कर्जे
- तरुण – PMMY Mudra Loan योजने अंतर्गत ५ ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
- किशोर – Mudra Loan योजनेंतर्गत कर्ज ५० ते ५ लाख रुपयांपर्यंत मंजूर होऊ शकते.
- शिशु – ५०,०००/- रुपयांपर्यंतची कर्ज मंजुरी मिळू शकते.
कर्ज लाभार्थी पात्रता
- लघु उद्योग व्यवसाय मालक यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- फळ आणि भाजी विक्रेते देखील मुद्रा लोनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- दुग्ध उत्पादक.
- कुक्कुटपालन व्यावसायिक.
- मत्स्यपालन व्यवसाय करणारे.
- विविध शेतीविषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार.
मुद्रा लोन योजना कर्ज देणाऱ्या बँकेची यादी.
- ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- यूनियन बँक ऑफ इंडिया
- सिंडिकेट बँक
- आंध्र बँक
- बँक ऑफ महाराष्ट्र
- देना बँक
- आईडीबीआई बँक
- कर्नाटक बँक
- पंजाब नेशनल बँक
- तमिलनाडु मर्चंड बँक
- एक्सिस बँक
- केनरा बँक
- फेडरल बँक
- इंडियन बँक
- कोटक महिंद्रा बँक
- सरस्वत बँक
- अलाहाबाद बँक
- बँक ऑफ इंडिया
- कॉरपोरेशन बँक
- आईसीआईसीआई बँक
- j&k बँक
- पंजाब एंड सिंध बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- एचडीएफसी बँक
- इंडियन ओवरसीज बँक
- यूको बँक
- बँक ऑफ़ बरोदा
ग्रामीण भागासह शहरीभागामध्ये बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी अशा बेरोजगार युवकांनी जर मुद्रा योजनेचा लाभ घेतला तर नक्कीच त्यांना व्यवसाय करण्यासाठी मदत मिळू शकेल.
मुद्रा लोन योजना शिवाय कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास सगळ्यात आधी त्या योजनेची माहिती हवी असते. कारण तुम्हाला जर एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे परंतु तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल तर मात्र नक्कीच तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेण्यास अडचण येवू शकते.
जिल्हा परिषद योजना जालना म्हणजेच zp yojana jalna संदर्भातील अधिकची माहिती घेण्यासाठी वेबसाईटला भेट देत राहा.