आपली चावडी वेबसाईट वर बघा जमिनीचे तपशील.

तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला आपली चावडी वेबसाईट वर जमिनीचे तपशील कसे बघावेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण शेतकरी आणि जमीन यांचे नाते अगदी घट्ट असते त्यामुळेच जमिनीच्या व्यवहारासंबधी काय अपडेट आहे या संदर्भातील माहिती जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

केवळ जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रील शेतकरी कधीही आणि कोठूनही त्यांच्या जमिनीचे किंवा गावातील इतर कोणत्याही व्यक्तीचे तपशील अगदी त्यांच्या मोबाईलवर बघू शकतात.

आपली चावडी aapli chawadi विषयी संपूर्ण माहिती बघा.

जमीन हा विषय शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे आजच्या लेखामध्ये माहिती जाणून घेवूयात ई आपली चावडी aapli chawadi या विषयी संपूर्ण माहिती.

खेडेगावामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ज्या दिवशी एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या दिवसाच्या एक दिवस अगोदर गावामध्ये दवंडी दिली जाते. जो निर्णय घेणार आहे त्या संदर्भात नागरिकांना सूचित केले जाते.

साधारणपणे हनुमान मंदिर किंवा गावातील मुख्य दर्शनीभागामध्ये असे गावातील निर्णय घेतले जातात. असे निर्णय ज्या ठिकाणी घेतले जातात त्याला आपण चावडी म्हणतो. गावातील प्रत्येक निर्णयावर या चावडीमध्ये विचार विनिमय केले जातात आणि यावर एकमताने निर्णय घेतले जातात.

पुढील योजना पण बघा. samaj kalyan yojana jalna 2022 कर्ज योजना अर्ज सुरु.

गावकऱ्यांची चावडी तशीच शासनाची आपली चावडी वेबसाईट

आता थोडा शासनाचा विचार करूयात. शासनाची शेतकऱ्यांसाठी एखादी योजना असेल किंवा शेती संबधित कोणती माहिती असेल आणि ती गावातील नागरिकांना द्यायची असेल तर ग्रामसेवक किंवा तलाठी यांना गावात यावे लागते. ग्रामपंचायत किंवा गावातील चावडीमध्ये हा शासन निर्णय किंवा शासकीय योजनेची माहिती दिली जाते.

ज्यावेळी हि माहिती दिली जाते त्यावेळी प्रत्येक नागरिक चावडीवर येईलच असे नाहीत त्यामुळे काही नागरिकांना या शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची माहिती न मिळण्याची शक्यता असते.

याच बाबीच महत्व लक्षात घेवून शासनाच्या महसूल विभागाने आपली चावडी aapli chawadi हि संकल्पना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. आपली चावडी वेबसाईट वर शेतकऱ्यांना जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची संपूर्ण माहिती दिसणार आहे.

आपली चावडी योजना

गावातील जमीन विकली किंवा घेतली तर आपली चावडी वेबसाईटवर दिसेल सूचना

असे समजूयात कि तुमच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याने त्याची जमीन कोणाला तरी विकली. ती जमीन तुमच्या जमिनीशेजारी आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याने कोणाला आणि किती किमतीला जमीन विकलेली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपली चावडी aapli chawadi द्वारे तुमच्या मोबाईलवर बघू शकता.

दुसऱ्याच्या जमिनीची माहिती बघणे योग्य आहे का.

आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न पडेल कि दुसऱ्याची माहिती बघणे योग्य आहे का अर्थातच योग्य असेल त्यामुळेच तर शासनाने हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.

ज्या प्रकारे गावतील चावडीवर गावातील निर्णय होतात. अगदी अशीच माहिती तुमच्या जमिनीशी सुरु असलेले व्यवहार गावातील सर्व नगरीकांना कळावे यासाठी आपली चावडी aapli chawadi तयार करण्यात आलेली आहे.

या माहितीचा फायदा काय होईल.

समजा अ आणि ब नावाचे दोन शेतकरी आहेत ज्यांची जमीन शेजारी आहे. अ हा शेतकरी ब शेतकऱ्याच्या जमिनीशी निगडीत आहे जसे कि शेत रस्ता किंवा इतर बाबी तर अशावेळी ब या शेतकऱ्याने गुपचूप जमीन विकली तर अ या शेतकऱ्यास अडचण येवू शकते.

अशा परिस्थितीमध्ये अ या शेतकऱ्याने जर आपली चावडी aapli chawadi हि माहिती तपासली तर तर तो ब या शेतकऱ्यावर आक्षेप घेवू शकतो.

खरेदी, वाटणीपत्रक, वारसफेर इत्यादी जे व्यवहार तुमच्या गावात झाले असतील तर या संबधित कोणताही व्यवहार तुम्ही अगदी चुटकीसरशी तुमच्या मोबाईलवर बघू शकता. या साठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

असे चेक करा तुमच्या गावातील सर्व जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार आपली चावडी वेबसाईटवर

  • भूमी अभिलेख bhumiabhilekh असा कीवर्ड गुगलमध्ये टाकून सर्च करा.
  • महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
  • वेबसाईटवर आपली चावडी aapli chawadi असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा कॅपचा कोड टाका आणि आपली चावडी पहा या बटनावर क्लिक करा.

जसे हि तुम्ही वरील माहिती टाकल आणि सबमिट कराल त्यावेळी तुमच्या गावातील संपूर्ण जमीनच्या व्यवहाराची माहिती तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.

फेरफार नंबर, फेरफार प्रकार, फेरफार दिनांक, हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख, सर्वे किंवा गट नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.

अधिकृत वेबसाईट लिंक

या संपूर्ण माहितीचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमच्या गावातील जमिनींच्या व्यवहारांचे तपशील बघू शकता. व्हिडीओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

व्हिडीओ पहा.

Leave a Comment