प्लास्टिक बंदी शासन निर्णय 2022

प्लास्टिक बंदी शासन निर्णय एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची सूचना जालना नगर परिषद Jalna Nagar Parishad यांच्या वतीने दैनिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्द करण्यात आलेली आहे.

प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यास हलक्या आणि स्वस्त असल्यामुळे अनेकजण या वस्तू वापरतांना दिसत आहेत. २०२० पासून ४०-५० कोटी टन प्लॅस्टिकचे उत्पादन झाले आहे.

जर असेच चालू राहीले  तर २०५० पर्यन्त ११० कोटी टन पेक्षा जास्त प्लॅस्टिकचे उत्पादन होईल. पण मित्रांनों प्लॅस्टिकमुळे पर्यावरणावर किती वाईट परिणाम होत आहे आहे याची कल्पना न केलेली बरी. 

एकेरी प्लॅस्टिक म्हणजे एकदा वापरुन फेकून देणे. जे रिसायकल होत नाही. जे प्लॅस्टिक आपण पुन्हा वापरू शकत नाही.

एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकला एकल प्लॅस्टिक किंवा डिस्पोजेबल प्लॅस्टिक पण म्हणू म्हणतात.

पुढील लेख पण वाचा मुद्रा लोन योजना 2022 असा करा अर्ज

असले प्लॅस्टिक एकदा वापरुन आपण फेकून देतो. एकल प्लॅस्टिक स्वस्त असल तरी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी खूप खर्च येतो.

जेंव्हा आपण प्लॅस्टिक फेकून देतो तेंव्हा ते प्लॅस्टिक कचऱ्यात जाते. त्यावर पाणी  पडतो आणि त्यामुळे डासांची निर्मिती होते. जीव जंतू तसेच किटाणू निर्माण होतात ज्यामुळे आजार मोठ्या प्रमाणत वाढतो.

एवडेच नव्हे तर प्लॅस्टिक जनावरांच्या पोटात पण जावू सकते आणि त्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याचा जवळपास सर्वच प्राणी, मानव आणि पर्यावरणवर वाईट परिणाम होतो. काही प्लॅस्टिक वस्तु बनवण्यासाठी ज्या केमिकलचा वापर केला जातो ते केमिकल खूप हानिकारक असतात.

त्या केमिकल मुळे कॅन्सर सारखे आजार देखील उद्भवू शकतात. जेंव्हा आपण प्लॅस्टिकच्या वस्तुमध्ये काही खातो पितो तेंव्हा त्याबरोबर केमिकल आपल्या शरीरात जात असतात.

पर्यावरण मंत्रालयच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी ३५ लाख टन प्लॅस्टिक पासून कचरा होतो. म्हणजे प्रत्येक माणुस दरवर्षी २.५ किलोग्राम प्लॅस्टिक कचरा निर्माण करतो.

म्हणून केंद्र सरकारच्या पर्यावरण व वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना क्रमांक G.S.R.<५७१(E) दिनांक १२ आगस्ट २०२१ रोजी जारी केली आहे. प्लास्टिक बंदी शासन निर्णय.

या नुसार १ जुलै २०२२ पासून एकल वापर प्लॅस्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणी वापरावर पूर्णपणे बंदी असणार आहे.

प्लास्टिक बंदी शासन निर्णय

जवळ-जवळ १९ प्रकारच्या एकल वापराच्या प्लॅस्टिकवर बंदी आहे. त्यात कोण-कोणत्या प्लॅस्टिक च्या वस्तू आहेत ते आपण पाहूयात. 

  • प्लॅस्टिक च्या स्ट्रॅ                                            
  • प्लॅस्टिकच्या मिठाईचे बॉक्स 
  • प्लॅस्टिक स्टिक च्या एअरबड्स                         
  • आमंत्रण कार्ड 
  • आईसक्रीम स्टिक्स                                         
  • प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग
  • कँडी स्टिक्स.                                              
  • प्लॅस्टिकच्या चमच. 
  • सजावट साठी वापरल्या जाणारे थॅरमोकॉल.           
  • प्लॅस्टिकचे चाकू. 
  • प्लॅस्टिकच्या प्लेट.                                           
  • प्लॅस्टिकचे ट्रे. 
  • प्लॅस्टिकचे कप.                                              
  • प्लॅस्टिकचे ग्लास.
  • प्लॅस्टिकचे झेंडे.                                              
  • प्लॅस्टिकची बॉटल. 
  • सिगारेट पॉकिटावरील गुंडाळलेले फिल्म.

वरीलप्रमाणे इतरही बऱ्याच प्लॅस्टिक वस्तूवर बंदी घालण्यात आलेली आहे. प्लास्टिक बंदी अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून दैनिक वर्तमान पत्रातील जालना नगर परिषद सूचना jalna nagar parishad notice बघू शकता. तर अशा प्रकारे हा प्लास्टिक बंदी शासन निर्णय होता.

वर्तमान पत्रात प्रसिद्द झालेली नोटीस पहा.

सदरच्या जाहीर सुचनेद्वारे सर्व उत्पादक, साठवणूकदार, वितरनकर्ता, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्ययसाईक आस्थापना ( मॉल, मुख्य बाजार विक्री केंद्र/ सिनेमा केंद्र / पर्यटन ठिकाण / शाळा / महाविद्यालय / कार्यालयीन इमारती / रुग्णालय व खाजगी संस्था) तथा सामान्य नागरीकांना सूचित करण्यात आलेल आहे की वर दिलेल एकेल प्लॅस्टिक बाळगणे, वापरणे बंद करावे.

नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. १ जुलै नंतर ज्याच्याकडे एकल प्लॅस्टिक वस्तु आढळून येतील त्यावर कार्यवाई करण्यात येणार आहे.

प्लास्टिक माल जप्त करण्यात येणार असून पर्यावरणीय नुकसान भरपाई घेण्यात येईल. व्यावसायिक आस्थापणा यांचे कामकाज बंद करण्यात येईल. कार्यवाही म्हणून किती दंड आकरण्यात येणार आहे ते बघूया. 

प्लास्टिक बंदी शासन निर्णय
प्लास्टिक बंदी शासन निर्णय

प्रथम गुन्हा उल्लंघन    ५,०००/- रूपये दंड 

दुसरा  गुन्हा उल्लंघन    १०,०००/- रूपये दंड 

तिसरा  गुन्हा उल्लंघन    २५,०००/- रूपये दंड आणि ३ महीने तुरंगवास 

रोजच्या दैनंदिनी कामात प्लॅस्टिकची गरज पण खूप वाढलेली आहे. परंतु खालील बाबीचा पर्यायी म्हणून वापर करता येईल.

  • प्लॅस्टिक पिशवी एवजी कमी मायक्रॉनची पिशवी किंवा कापडी पिशवी वापरावे.
  • नागरिकांनी प्लॅस्टिक स्ट्रॅ एवजी स्टेनलेस स्टील स्ट्रॅ वापरावे.
  • प्लॅस्टिक ग्लास एवजी पुन्हा वापरात येणारे ग्लास वापरावे.
  • प्लास्टिक बॉटल एवजी स्टील बॉटल वापरावी.

वरील सर्व वस्तू प्लॅस्टिक पेक्षा महाग जरी असल्या तरी पण जेवडे कमी खर्च आपल्याला या प्लॅस्टिकच्या वस्तू घेण्यासाठी लागतो त्यापेक्षा किती तरी जास्त पटीने खर्च आपल्याला प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचाऱ्यासाठी लागतो. पर्यावरणावर प्लॅस्टिक कचऱ्यामुळे परिणाम होतो. प्लास्टिक बंदी शासन निर्णय नक्कीच अभिमानास्पद आहे.

एकल प्लॅस्टिक बंद केल्यामुळे फक्त मानवी जीवनाचा फायदा होणार आहे असे नाही. दरवर्षी समुद्रामध्ये १५ कोटी टन प्लॅस्टिकचा कचरा फेकला जातो.

भारतातील प्रमुख नद्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो आणि हाच कचरा काढण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे अभियान राबवावे लागतात. या अभियानासाठी लाखों रुपये खर्च केला जातात.

त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन व्यवहारामध्ये पर्यावरण पूरक वस्तूचा वापर केला तर नक्कीच याचा फायदा होईल. प्लास्टिक बंदी शासन निर्णय घेतल्याने नक्कीच फायदा होईल यात शंका नाही.

Leave a Comment