ऑनलाईन फेरफार अर्ज करा घरबसल्या ऑफलाईन बंद.

शेतकरी बंधुंनो ऑनलाईन फेरफार अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. जालना जिल्हा संदर्भात आपण विविध माहिती जाणून घेत आहोत. आता जाणून घेवूयात ई हक्क प्रणाली संदर्भातील माहिती.

ई हक्क प्रणाली वापरून आता जालना जिल्ह्यातील शेतकरीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी फेरफार अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतांना दिसेल. त्यामुळे ऑनलाईन फेरफार अर्ज संदर्भात माहिती जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

यापुढे शेतकरी अगदी घरी बसून नऊ प्रकारचे ऑनलाईन फेरफार अर्ज ऑनलाईन करू शकतात. ऑनलाईन फेरफार अर्ज करण्याची पद्धत कशी असते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

Table of Contents

  शेतकरी व महसूल विभाग यामध्ये घनिष्ट संबध येतो. शेती संदर्भातील अनेक कागदपत्रे ऑनलाईन झालेली आहेत. आता ऑनलाईन फेरफार अर्ज करणे अनिवार्य केले गेले आहे. महसूल विभागामधील कामकाज अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक करण्यासाठी ई हक्क प्रणालीमध्ये ई फेरफार प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

  शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन फेरफार अर्ज पद्धत सोयीस्कर.

  जमिनीचा व्यवहार जर करायचा असेल तर तलाठी यांचाकडे तसा अर्ज करावा लागतो. मग तलाठी पुढील कार्यवाही करत असतात. आता हेच अर्ज ऑनलाईन करावे लागणार आहेत.

  १५ जून २०२२ पासून शेतकऱ्यांना जर फेरफार करायचा असेल तर ई हक्क प्रणालीद्वारे त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

  ऑनलाईन फेरफार अर्ज संदर्भातील बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

  बातमी पहा

  नऊ प्रकारचे फेरफार आता ई हक्क प्रणाली वापरून करता येणार.

  खालील बाबींसाठी करू शकाल ऑनलाईन फेरफार अर्ज

  खलील नऊ प्रकारचे फेरफार अर्जदारांना अगदी घरी बसून करता येणार आहेत.

  • वारसाची नोंद करणे.                                
  • ई – करार नोंदणी. 
  • बोजा चढविणे.                                       
  • बोजा कमी करणे. 
  • मयताचे नाव कमी करणे.                          
  • अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे. 
  • एकत्र कुटुंब कर्ताची नोंद कमी करणे.         
  • विश्वस्तांचे नाव बदलणे. 
  • संगणीकृत सात बारा मधील चूक दुरुस्ती करणे.

  वरील दिलेल्या एकूण नऊ प्रकारापैकी शेवटचा जो पर्याय आहे तो म्हणजे संगणीकृत सात बारा मधील चूक दुरुस्ती करणे या संदर्भातील प्रत्यक्ष प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळेल. त्या व्हिडीओची लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे.

  तो व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला उर्वरित फेरफार कसे करावे लागतात याची कल्पना येईल.

  तलाठी भेटत नाही, तलाठी अर्ज घेत नाही, कामात पारदर्शकता नाही असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांचे सुटणार आहेत. शेतकऱ्यांचे ७/१२ वर फेरफार नोंदणी होत नाही.

  ऑनलाईन फेरफार अर्ज

  म्हणून कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी शाशनस्तरावरून ई हक्क प्रणालीत ई फेरफार प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे आता १५ जुन पासून केवळ ई -फेरफार ई-हक्क प्रणालीद्वारे अर्जदारांना तल्याठयाकडील विविध नऊ प्रकारची फेरफार ऑनलाइन करण्याची सुरुवात झाली आहे. 

  जाणून घ्या फेरफार म्हणजे काय 

  जमिनीच्या कामकाजात आपण किती वेळा फेरफार हा शब्द ऐकल असेल. पण बऱ्याच जणांना फेरफार म्हणजे काय किंवा त्याची नोंद कशी करावी या बद्दल माहीत नसण्याची शक्यता असते.

  फेरफार म्हणजे गाव नमूना नंबर ६ मधील नोंदवाही ज्याला हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही पण म्हणतात.

  या नोंदवाहित जमिनीचे सर्व व्यवहार होतात. हे सर्व व्यवहार ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच तलाठी कार्यालयात जावून होत असत. पण आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

  ई- फेरफार प्रणालीद्वारे कोणते काम होणार.

  ई- फेरफार प्रणालीमधून केलेल अर्ज तलाठयांना फेरफारमध्ये रूपांतरित करता येणार आहे. त्यामुळे तलाठयांना पुन्हा डाटा एंट्री करायची गरज पडणार नाही त्यामुळे त्यांचे काम खूप सोपे होणार आहे. 

  फेरफारची नोंदणी कोण मंजूर करतात असा प्रश्न पडतो. काही जणांना असेही वाटत असेल कि फेरफाराची मंजुरू तलाठी करत असावेत पण असे होत नाही.

  पुढील लेख पण वाचा आपली चावडी वेबसाईट वर बघा जमिनीचे तपशील.

  तलाठयाकडून फक्त फेरफाराची नोंदणी केली जाते. नोंदणी मंजूर करण्याचे काम मंडळ अधिकारी किंवा सर्कल भाऊसाहेब प्रणालीत करत असतात. सध्या तरी अशीच पद्धत आहे भविष्यामध्ये यामध्ये बदलही होऊ शकतो.

  असा नोंदविला जातो फेरफार

  फेरफार नोंदणीसाठी चार स्तंभ आखले जातात. 

  • पहिल्या स्तंभात फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहिला जातो. 
  • दुसऱ्या स्तंभात हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकारचे स्वरूप लिहिले जाते. तचेच यामध्ये व्यवहाराचे स्वरूप, संबंधित खतेदारचे नाव, व्यवहाराचा दिनांक, मोबदला रक्कम अशा बाबींचा पण समावेश असतो. 
  • तिसऱ्या स्तंभात जमिनीच्या व्यवहारासाठी लागणारे गट नंबर किंवा सर्वे नंबर लिहिला जातो. 

  चौथा स्तंभात फेरफारबद्दल संबंधीतांना नोटिस देवून, चौकशी करून केलेला फेरफार बरोबर आहे का याची खात्री केले जाते. संबंधित अधिकाऱ्यांचा आदेश या मध्ये देवून पदनाम लिहून स्वाक्षरी करतात. 

  ऑनलाईन फेरफार अर्ज पद्धत

  • सर्वप्रथम महसूल विभागाची वेबसाइट ओपेन करावी लागेल. 
  • त्यानंतर पब्लिक डाटा एंट्री नावाचे एक पेज ओपेन होईल. 
  • त्यामध्ये जर तुमच अगोदर रजिस्ट्रेशन झालेले असेल तर तुम्ही यूजरनेम, पासवर्ड व कॅपचा कोड टाकून लॉगिन या बटनावर क्लिक करावे.
  • जर तुमचे या अगोदर रजिस्ट्रेशन झालेले नसेल तर क्रिएट न्यू यूजर या लिंकवर क्लिक करून नवीन अकाऊंट बनवावे लागेल. 

  त्यानंतर तुम्हाला यूजर चा प्रकार निवडायच आहे जर सामान्य नागरिक असाल तर यूजर इज सिटीजन असा ऑप्शन निवडुन प्रोसेस या बटनावर क्लिक करा.

  तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर अर्ज प्रणाली ई-हक्क असे पेज ओपेन होईल. तलाठ्याकडे ज्या फेरफारासाठी अर्ज करायचं आहे ते पर्याय निवडा.

  खालील माहिती व्यवस्थित भरा.

  अर्जाचा पेज ओपेन होईल त्यात अर्जदाराचे त्यामध्ये खालील माहिती व्यवस्थित टाकावी.

  • अर्जदाराचे नाव.
  • वडीलाचे नाव.
  • मोबाइल नंबर.

  वरीलप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भारत जावून सेव करत पूढ जायच आहे, शेवटी डॉक्युमेंटचा ऑप्शन येईल त्यासाठी डॉक्युमेंट वर स्व:ताची सही करून स्कॅन करून उपलोड करावा.

  त्यानंतर एक स्वयघोषणपत्र  भरून agree या ऑप्शन वरती क्लिक करावे आणि अर्ज सबमिट करावा.

  त्यानंतर अर्ज तलाठी कार्यालयात जाईल, अर्जाची छाननी होईल आणि तुमची नोंदणी मंजूर होईल. 

  ऑनलाईन फेरफार अर्ज संदर्भातील व्हिडीओ पहा.

  फेरफार ऑनलाईन करण्याची पद्धत अधिक सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावी यासाठी ई हक्क प्रणालीचा उपयोग करून सातबारा दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा केला जातो या संदर्भातील व्हिडीओ लिंक खाली डेत आहोत तो व्हिडीओ पाहून तुम्ही तुमचा सातबारा ऑनलाईन दुरुस्तीसाठी अर्ज करू शकता.

  हा व्हिडीओ बघितल्या नंतर अशाच पद्धतीने इतर फेरफार करण्याची कल्पना तुम्हाला येईल.

  व्हिडीओ पहा.

  Leave a Comment