शेतकरी बंधुंनो ई पिक पाहणी व्हर्जन 2 उपलब्ध झाले असून शेतकरी बांधव हे वर्जन डाउनलोड करून त्यांच्या शेतातील पिकांची इ पिक पाहणी करू शकतात.
ई पिक पाहणी व्हर्जन 2 या मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतातील पिकांची नोंदणी कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
e peek pahani version 2 ई पिक पाहणी ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावर करणे गरजेचे आहे.
इ पिक पाहणी मोबाईल ॲपचा उपयोग बऱ्याच शेतकऱ्यांनी केला असला तरी अजूनही बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना हि पद्धत माहितीच नाही. किंबहुना हे ॲप्लिकेशन वापरायचे कसे याची सविस्तर माहिती अशा शेतकरी बांधवाना अजून नाही.
ई पिक पाहणी व्हर्जन 2 उपलब्ध
नवीन ई पिक पाहणी ॲप्लिकेशन वर्जन २ वर्जन वापरण्याचे आवाहन
ई पिक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन 2 चा उपयोग करून शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची करावी असे असे आह्वान करण्यात आलेले आहे.
ई पिक पाहणी मोबाईल ॲप च्या जुन्या वर्जनमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या असल्याने शेतकऱ्यांना हे ई पिक पाहणी मोबाईल ॲप वापरता आले नाही. त्यामुळे शासनाने आता नवीन वर्जन २ हे इ पिक पाहणी ॲप्लिकेशन आणले आहे.
ई पिक पाहणी ॲप्लिकेशन वर्जन २ डाउनलोड करा.
ई पिक पाहणी ॲप्लिकेशन वर्जन २ डाउनलोड करण्याची अधिकृत लिंक आलेली आहे. खालील लिंकवर क्लिक करताच तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर रीडायरेक्ट व्हाल.
ई पिक पाहणी व्हर्जन 2 ॲप्लिकेशनमध्ये छायाचित्राचे अक्षांस रेखांश सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अचूकता निर्माण होते.
चला तर आता जाणून घेवूयात कि हि पिक पाहणी आपल्या मोबाईलवरून कशी करावी.
- सगळ्यात अगोदर दिलेल्या लिंकवर क्लिक करून नवीन इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन वर्जन २ डाउनलोड करून घ्या.
- इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर इंस्टाल करून घ्या.
- एकदा का हे इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन वर्जन २ तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल झाले कि मग तुम्हाला तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी करायची आहे.
इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन वर्जन २ च्या सहाय्यने पिकांची नोंदणी कशी करावी हे अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावे यासाठी खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करा.