गटई कामगार योजना अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. जालना जिल्ह्यातील कामगार यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ जुलै देण्यात आली होती ती आता १९ ऑगस्ट २०२२ करण्यात आलेली आहे.
म्हजेच गटई कामगार योजना अर्ज करण्यासाठी जालना जिल्हा कामगार जे कि या योजनेसाठी पात्र असणार आहेत अशा कामगारांनी किंवा पात्र व्यक्तींनी या योजनेसाठी शेवट दिनांक १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत त्यांचे अर्ज सादर करावेत असे आह्वान करण्यात आलेले आहे.
गटई कामगार योजना अंतर्गत अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या कामगारांना त्यांच्या व्यवसाय सुलभतेसाठी लोखंडी पत्रा स्टॉल शासकीय अनुदानावर उपलब्ध करून दिले जाते. जालना जिल्ह्यातील अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पत्र लाभार्थ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.
पुढील माहिती पण कामाची आहे ई पिक पाहणी व्हर्जन 2 उपलब्ध download link
लगेच अर्ज करून द्या गटई कामगार योजना अंतर्गत लोखंडी पत्रा स्टॉल मिळविण्यासाठी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने गटई कामगार योजना अंतर्गत लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जालना जिल्ह्यातील पात्र व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना त्यांच्या उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी या लोखंडी पत्र्याचे स्टॉलचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल तर लगेच अर्ज करून द्या.
लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी या अगोदर दिनांक २९ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
आता या अर्जाची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे म्हणजेच आता १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्जदार त्यांचे लोखंडी पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज सादर करू शकतात.
गटई कामगार योजना पात्रता
गटई कामगार योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत. अर्ज कोठे करावा. कोणती कागदपत्रे लागणार आहेत या संबधी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप हि योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येते.
या व्यतिरिक्त देखील विविध कल्याणकारी योजना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येतात. या योजनांची माहिती घेण्यासाठी इच्छुक व्यक्ती समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या वेबसाईटला भेट देवू शकतात.
अर्ज करण्यास मुदतवाढ
अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतील. तुम्ही जर या प्रवर्गातील असाल तर लगेच अर्ज करण्याच्या शेवट दिनांकाच्या आत म्हणजेच १९ ऑगस्ट २०२२ च्या आत तुमचा अर्ज करून द्या.
गटई कामगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
जालना जिल्ह्यातील कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.
- चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला.
- अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला दाखला.
- अर्जदाराचे किंवा कुटुंबाचे रेशन कार्ड.
- गटई कामाचे प्रमाणपत्र/अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र.
- जागेचे ना हरकत प्रमाणपत्र.
- आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.
वरील प्रमाणे कागदपत्रे जालना जिल्ह्यातील अर्जदाराने अर्जासोबत जोडून द्यावीत. लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.
तुम्ही जर जालना जिल्हा व्यतिरिक्त जिल्ह्यातील असाल तर संबधित कार्यालयाशी संपर्क साधा.
जालना जिल्ह्यातील अर्जदारांनी १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अर्ज करण्याच्या शेवट दिनांकाच्या आत म्हणजेच १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करून द्यावेत त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
गटई कामगार योजना अंतर्गत लोखंडी पत्र्याचे स्टॉलसाठी अर्ज करून लाभार्थी त्यांच्या व्यवसाय सुरु करू शकतात. या योजनेमुळे गटई कामगार त्यांचा व्यवसाय उद्योग उभारता यावा हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींनी वरती दिलेले कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज सादर करून द्यावेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांच्या अधिक माहितीसाठी सामाजिक विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला तुम्ही भेट देवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या योजनांचा जस्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.
जालना जिल्हा शेतकरी योजना माहिती.
जालना जिल्हा परिषद योजना व्यतिरिक्त इतर योजनांची माहिती या पोर्टलवर दिली जाते. जालना जिल्ह्यातील शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळण्यास अडचण येवू शकते. अशावेळी केवळ माहिती नसल्याने अनेक शेतकरी अशा योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते.
त्यामुळे जालना जिल्हा तसेच इतर महत्वाच्या योजनांची माहिती तुम्हाला https://jalnazpyojna.in/ या वेबसाईटवर तुम्हाला नियमितपणे मिळत राहील.