जालना जिल्ह्यासह संपूर्ण महराष्ट्रातील असंघटीत कामगारांना बांधकाम कामगार योजना bandhkam kamgar yojana jalna नोंदणी केल्यामुळे अनेक फायदे मिळतात.
आपण या ठिकाणी जरी जालना जिल्हा बांधकाम योजना संदर्भात माहिती जाणून घेत असलो तरी इतर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना देखील या माहितीचा फायदा होणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगार योजना संदर्भात माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
जालना जिल्ह्यामध्ये अनेक असंघटीत कामगार आहेत ज्यांनी अद्याप देखील त्यांचे रजिस्ट्रेशन केलेले नाही. बांधकाम कामगार नोंदणी केली नसेल तर शासनाच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अडचण येवू शकते.
पुढील माहिती पण पहा आपली चावडी वेबसाईट वर बघा जमिनीचे तपशील.
मात्र तुम्ही जर कामगार म्हणून नोंदंणी केली तर नक्कीच तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कशी करावी, कोणत्या वेबसाईटवर करावी त्याच प्रमाणे बांधकाम कामगारांसाठी कोणकोणत्या योजना असतात या संदर्भात अगदी सविस्तरपणे माहिती जाणून घेवूयात.
शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणत बेरोजगारी वाढलेली आहे. अनेक तरुण चांगले शिक्षण घेवून सुद्धा नोकरी न लागल्यामुळे वाटेल ते काम करतांना दिसतात.
नोंदणीकृत मजुरांचा मिळतो बांधकाम कामगार योजना लाभ.
जालना जिल्हा शहर व तसेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणत बांधकाम कामगार म्हणून अनेकजण काम करतात.
जे बांधकाम कामगार त्यांची नोंदणी करतात त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळतो. बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही पद्धतीने करता येते. बांधकाम कामगार योजना लाभ कसा घ्यावा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात.
बांधकाम कामगार योजना साठी तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू इच्छित असाल तर बांधकाम कामगार नोदंणी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ या वेबसाईटवर हि नोंदणी करावी लागते.
नोंदणी केल्यावर कामगारांना रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि याच रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने बांधकाम कामगारांना विविध बांधकाम कामगार योजना चा लाभ दिला जातो.
बांधकाम कामगार योजना माहिती labour construction worker scheme jalna
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना |
योजनेसाठी पात्र व्यक्ती | इमारत व इतर बांधकाम करणार कामगार. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन व ऑफलाईन |
ऑनलाईन अर्ज कोठे करावा | बांधकाम कामगार वेबसाईट |
ऑफलाईन अर्ज कोठे करावा | जिल्हा कामगार कार्यलय. |
बांधकाम कामगार योजना नोंदणी झाली कि खालील योजनाचा लाभ मिळू शकतो.
- बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता ५१००० रुपये अनुदान देण्यात येते.
- अपघाताने किंवा नैसर्गिकपणे जर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर अशावेळी त्याचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च महाराष्ट्र कामगार मंडळ यांच्या वतीने करण्यात येतो.
- काम सुरु असतांना बांधकाम कामगारांचा अपघाताने हात किंवा पाय निकामी झाला तर त्या बांधकाम कामगारास अआर्थिक सहाय्य दिले जाते.
- बांधकाम कामगारांच्या मुला किंवा मुलीकरिता इयत्ता १ पासून पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.
- कामगारांचा मुलगा जर अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर त्यासाठी कामगार मंडळाच्या वतीने विशेष सहाय्य दिले जाते.
- जालना जिल्ह्यातील अनेक मजुरांकडे स्वतःचे घर नसते यामुळे या योजनेतून बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ देखील दिला जातो. बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- बांधकाम कामगार आजारी पडला किंवा बांधकाम कामगाराची पत्नी बाळंतीण झाली तर अशावेळी देखील महाराष्ट्र कामगार मंडळाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
- बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच safety kit दिली जाते.
- कामगारांना मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन देखील पुरविले जाते.
कुठे आणि कशी करावी बांधकाम कामगार योजना नोंदणी.
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली तर वरील प्रमाणे मजुरांना लाभ मिळतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बांधकाम कामगार नोंदणी कुठे आणि कशी करावी.
जालना येथे बांधकाम कामगार कार्यालयामध्ये भेट देवून देखील तुम्ही तुमची नोंदणी करू शकता. तुम्ही जालना जिल्ह्या बाहेरील असाल तर संबधित जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्यालय असते या ठिकाणी भेट देवून कोणताही पात्र लाभार्थी त्यांची नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवू शकतो.
शिवाय तुम्ही ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटला भेट द्या किंवा खालील लिंकवर क्लिक करा.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली लिंक खाली दिलेली आहे. परंतु ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या कि हि बांधकाम कामगार योजना नोंदणी करण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे गरजेचे आहे.
नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक
- अर्जदारास एका वर्षामध्ये ९० दिवसापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये काम करणे गरजेचे आहे.
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगार त्यांची नोंदणी करू शकतात.
- बांधकाम कामगार मंडळामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी Form – V भरणे आवश्यक आहे.
- या अर्जासोबत वयाचा पुरावा प्रमाणपत्र जोडावे.
- ९० दिवस काम केल्याचे प्रमाण पत्र देखील जोडावे.
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा.
- पासपोर्ट आकाराचे तीन फोटो.
- नोंदणी फी २५ रुपये भरणे आवश्यक.
- ६० रुपये वर्गणी ५ वर्षासाठी भरणे आवश्यक.
ऑनलाई अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे pdf अर्ज बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. jalna bandhkam kamgar nondni
हे सर्व फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्पुटरमध्ये डाउनलोड करू शकता. यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तर अशा प्रकारे जालना किंवा इतर जिल्ह्यातील बांधकाम कामगार त्यांची नोंदणी करू शकतात आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवू शकतात.
ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील व्हिडीओ देखील मदत करू शकतो.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना.
जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जिल्हा परिषद योजना अंतर्गत अनेक उपक्रम राबविले जातात. जालना जिल्ह्यातील शेतकरी किंवा नागरिकांनी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समिती येथे जावून विचारपूस करावी.
जेणे करून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळू शकेल. जालना जिल्हा परिषद यांच्या वतीने ज्या योजना सुरु असतात किंवा ज्या योजनांसाठी अर्ज मागविले जातात त्या संबधित माहिती वर्तमान पेपरमध्ये सुद्धा दिली जाते.
अशावेळी दैनंदिन वर्तमान पत्र वाचल्यास देखील तुम्हाला या योजनांची माहिती मिळू शकते.