निर्धूर चूल योजना सुरु 31 ऑगस्ट शेवट तारीख

मोफत निर्धूर चूल योजना free biomass stove yojana सुरु झाली असून या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आलेले आहे.

मोफत निर्धूर चूल वाटप योजना केवळ जालना जिल्ह्यासाठीच नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहेत  free biomass stove yojana maharashtra. त्यामुळे तुम्ही जालना जिल्हा व्यतिरिक्त इतर कोणत्याही जिल्ह्यातील असाल तरी देखील हि माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

जालना जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ या तारखेच्या आत अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. मोफत निर्धूर चूल योजना अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा लागतो, यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात या संदर्भात या लेखामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

एवढेच नव्हे तर हि अर्ज प्रक्रिया कशी असते हे समजण्यासाठी एक व्हिडीओ देखील या लेखामध्ये दिलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही या मोफत निर्धूर चूल योजनेचा ऑनलाईन अर्ज nirdhur mofat chul yojana online form अगदी तुमच्या मोबाईलवरून करू शकतात.

पुढील योजना पण पहा बांधकाम कामगार योजना 2022 असा करा अर्ज

निर्धूर चूल योजना free biomass stove yojana

गाव खेड्यामध्ये असंख्य महिला भगिनी अजूनही स्वयंपाक करण्यासाठी लाकडाचे सरपण वापरतात. काही कुटुंबाकडे गॅस कनेक्शन जरी असले तरी गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे या महिला भगिनी त्या गॅसचा उपयोग करू शकत नाही परिणामी परत एकदा आपली चुलच बरी अशी म्हणण्याची वेळ या महिलांवर आलेली आहे.

लाकडी सरपण वापरून चुलीवर स्वयंपाक करतांना खूप मोठ्या प्रमाणत धूर निर्माण होतो. हा  निर्माण झालेला धूर महिलांच्या श्वसन नलिकाद्वारे त्यांच्या शरीरात जातो. यामुळे श्वसनाच्या विविध समस्या उद्भवतात महिला भगिनींना तसेच घरातील आबालवृद्ध यांना भेडसावतात.

याच बाबीचे महत्व लक्षात घेवून आता मोफत निर्धूर चुलीचे free biomass stove distribution yojana वाटप करण्यात येत आहे आणि यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत ज्याची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना महाराष्ट्र शासन राबवीत असते. यातीलच एक योजना म्हणजे मोफत निर्धूर चूल वाटप योजना

खेडेगावातील गरीब गरजू कुटुंबाना उज्जवला योजनेतून गॅस कनेक्शन दिल्यानंतर आता शासनातर्फे मोफत निर्धूर चूल योजना सुरु करण्यात आलेली आहे.

समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येते निर्धूर चूल योजना

समाज कल्याण विभागाच्या वतीने हि मोफत निर्धूर चूल योजना राबविली जाते. निर्धूर चूल योजना अर्ज कसा कारावा लागतो या संदर्भात संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. त्याप्रमाणे कृती करा किंवा खालील व्हिडीओ पाहून देखील ऑनलाईन अर्ज करता येवू शकतो.

मोफत निर्धूर चूल योजना माहिती.

 nirdhur chul yojana information for maharashtra

मोफत निर्धूर चूल वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरु करण्यापूर्वी या योजनेसाठी पात्रता कोणती आहे ते जाऊन घेवूयात जेणे करून अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला योजनेविषयी व्यवस्थित कल्पना येवू शकेल.

  • अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
  • गॅस कनेक्शन नसलेल्या अर्जदारास या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

Free biomass stove online yojana maharashtra applicaton documents.

  • राशन कार्ड छायांकित प्रत.
  • महाराष्ट्र रहिवासी पुरावा असणे गरजेचे.
  • आधार कार्ड छायांकित प्रत.
  • मोबाईल नंबर.
  • इमेल आयडी असणे देखील आवश्यक.
  • जातीचे प्रमाणपत्र
  • योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपतपत्र.

मोफत निर्धूर चूल योजना असा करा ऑनलाईन अर्ज.

मोफत निर्धूर चूल योजना अर्ज  प्रक्रिया अत्यंत सोपी असून अर्जदार त्यांच्या स्मार्ट फोनवरून देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा. खालील पद्धत जर समजण्यास अवघड जात असेल तर या लेखाच्या शेवटी व्हिडीओ दिलेला आहे तो बघून देखील अर्जदार अर्ज करू शकतात.

free biomass stove yojana online registration process.

  • https://maha-diwa.vercel.app/ या वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईट ओपन झाल्यावर एक फॉर्म तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल. अर्जामध्ये दिलेली माहिती व्यवस्थित भरा.
  • आधार कार्डवर जसे नाव दिलेले आहे. अगदी तसेच नाव दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करा.
  • अर्जदाराने त्यांच्या सुरु असलेला १० अंकी मोबाईल नंबर टाका व्यवस्थित टाकावा.
  • आधार क्रमांक दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करा.
  • संपूर्ण पत्ता टाका.
  • अर्जदार ज्या जिल्ह्यामध्ये राहत असेल तो जिल्हा आणि तालुका दिलेल्या यादीमधून निवडा.
  • तुमच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन आहे का असा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक म्हणजे Yes आणि दुसरा म्हणजे No. या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
  • आणखी एक प्रश्न या ठिकाणी अर्जदारास विचारला जाणार आहे आणि तो म्हणजे तुम्ही अनुसूचित जातीचे आहात का. असेल तर Yes आणि नसेल तर No या पर्यायावर क्लिक करा.
  • मोफत निर्धूर चूल योजनेचा अर्ज व्यवस्थित भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या.

मोफत निर्धूर चूल वाटप योजना ऑनलाईन अर्जाची माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी खालील व्हिडीओ पहा.

free biomass stove online application video

या लेखामध्ये खालील माहिती दिलेली होती.

  • मोफत निर्धूर चूल योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे.
  • कोणकोणते कागदपत्रे या योजनेची आवश्यक असतात.
  • कोणत्या वेबसाईटवर या योजनेसाठी अर्ज करावा लागतो.
  • ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो.
निर्धुर चूल योजना

योजना संदर्भातील बातमी वाचा.

ऑनलाईन अर्ज लिंक

तुम्ही ग्रामीण भागातील नागरिक असाल आणि तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी अजूनही लाकडाचे सरपण वापरले जात असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घेवून तुम्ही तुमच्या घरातील माता भगिनींना मदत करू शकता.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या.

शासनाच्या वतीने विविध शासकीय योजना राबविल्या जातात. बहुतांशी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध असते. परंतु ग्रामीण भागातील बऱ्याच नागरिकांना हे अर्ज कसे करावे लागते आणि कोणत्या वेबसाईटवर करावे लागते या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते.

अशावेळी जालना झेड योजना अर्थात jalna zp yojana या वेबसाईटवर जालना जिल्ह्यातील योजना संदर्भातील विविध योजनांची माहिती दिली जाते.

ज्या योजना जालना जिल्ह्यासाठी असतात त्या बहुतांशी इतर जिल्ह्यासाठी सुद्धा सारख्याच असतात. या योजनांची अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये थोडाफार फरक असू शकतो मात्र योजनेचे स्वरूप सारखेच असते.

त्यामुळे तुम्ही जालना जिल्ह्यातील रहिवासी नसाल म्हणजेच तुम्ही इतर जिल्ह्यातील असाल तरी देखील या वेबसाईटवरील माहिती तुमच्यासाठी कामाची ठरू शकते.

निर्धूर चूल योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

जालना जिल्ह्यासाठी मोफत निर्धूर चूल वाटप योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२२ आहे.

मोफत निर्धूर चूल योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

निर्धूर चूल योजना कोणत्या जिल्ह्यासाठी लागू आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हि योजना लागू आहे.

निर्धूर चूल योजनेसाठी मोबाईलवरून अर्ज करता येईल का?

हो मोफत निर्धूर चूल योजनेचा अर्ज अगदी मोबाईलवरून देखील करता येते. अर्ज अगदी सोपा आहे. अर्ज कसा करावा या संदर्भातील वरील लेखामध्ये दिलेला व्हिडीओ पहा.

Leave a Comment