गोदाम बांधकाम योजना सुरु 12.50 लाख अनुदान

गोदाम बांधकाम योजना godam bandhkam yojana jalna सुरु झाली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन कृषी विभाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

शेतातील माल योग्य वेळी बाजारात जर गेला नाही तर त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतातील माल साठवणुकीसाठी गोदाम असणे गरजेचे आहे. गोदाम बांधण्यासाठी जरा जास्तच खर्च येत असल्याने अनेक शेतकऱ्यांना असे गोदाम बांधणे शक्य होत नाही.

त्यामुळे गोदाम बांधण्यासाठी शासनाने गोदाम बांधकाम अनुदान योजना सुरु केलेली आहे. याचं योजनेची माहिती आपण या लेखामध्ये अगदी सविस्तरपणे घेणार आहोत. जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि तुम्हाला देखील तुमच्या पिकांची साठवणूक करण्यासाठी गोदाम उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल हि गोदाम बांधकाम योजना

गोदाम बांधकाम अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आलेले आहे. हे प्रास्तव लवकरात लवकर म्हणजेच २५ सप्टेंबर २०२२ पूर्वी सादर करणे गरजेचे आहे.

शासनाच्या विविध योजना सुरु असतात परंतु या योजनांची माहिती नसल्याने किंवा अर्ज प्रक्रिया कशी असते हे माहित नसल्याने अनेक नागरिक या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात.

तर अगदी हीच माहिती आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती मिळेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकाल.

गोदाम बांधकाम योजना अंतर्गत शासनाकडून १२.५० लाख एवढे अनुदान दिले जाते. यासाठी लाभार्थ्याला विहित नमुन्यामध्ये प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.

पुढील लेख पण वाचा मिनी ट्रॅक्टर योजना 3.50 लाख मिळणार.

गोदाम बांधकाम योजना अंतर्गत मिळेल १२ लक्ष ५० हजार रुपये अनुदान.

संबधित तालुक्यातील कृषी कार्यालयामध्ये तुम्ही गोदाम बांधकाम योजनेचा प्रस्ताव सादर करू शकता. जास्तीत जास्त २५० मेट्रिक टन गोदाम बांधकामासाठी भौतिक १ चा लक्षांक प्राप्त असून प्रत्यक्ष झालेल्या गोदाम बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लक्ष ५० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थीस दिली जाईल.

त्यामुळे गोदाम बांधकाम योजना साठी ज्यांना प्रस्ताव सादर करायचे आहेत त्यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत प्रस्ताव सादर करून द्यावा.

गोदाम बांधकाम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने बँकेकडे प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. ही योजना बँक कर्जाशी संबधित असून ज्यांना अर्ज करायचे आहे अशा इच्छुक नागरिकांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना नुसार संबधित प्रकल्प सादर करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे.

गोदाम बांधकाम योजनेचा jalna godam scheme लाभ तेंव्हाच मिळणार आहे जेंव्हा अर्जदारास बँक कर्ज देईल. बँकेने कर्ज दिल्यानंतरचं गोदाम बांधकामासाठी शासनाकडून दिले जाणारे जास्तीत जास्त १२.५० किंवा प्रकल्प खर्चानुसार जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून दिली जाणार आहे.

शेतकरी बांधव ज्यांच्याकडे शेती जास्त आहे आणि त्याची शेती गावापासून दूर आहे अशा शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतातील माल साठवण्यासाठी या गोदामाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे गोदाम बांधकाम अनुदानाचे पात्रतेचे निकष लक्षात घेवून या योजनेसाठी त्यांचे प्रस्ताव सादर करून द्यावेत जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.

गोदाम बांधकाम योजना संदर्भातील बातमी बघा.

गोदाम बांधकाम योजना अंदाजपत्रक आणि डिझाईन सादर करणे गरजेचे.

त्यामुळे ज्यांना गोदाम बांधकाम करायचे असेल अशा नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझाईन व गोदाम बांधकामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करणे गरजेचे आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवानी लगेच त्यांच्या तालुक्याच्या कृषी कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि त्यांचे प्रस्ताव शेवट दिनांक २५ सप्टेंबर २०२२ या शेवटच्या तारखेच्या आत सादर करून द्यावेत जेणे करून त्यांना गोदाम बांधकाम अनुदान योजनेचा लाभ मिळू शकेल.

गोदाम बांधकाम योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे त्यामुळे तुम्ही ज्या तालुक्यातील रहिवासी असाल त्या तालुक्याच्या तालुका कृषी कार्यालयास अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.

जालना जिल्ह्यातील अर्जदारांनी शेवट दिनांकाच्या आत अर्ज सादर करावेत.

जालना जिल्ह्यातील अर्जदारांनी त्यांचे प्रस्ताव दिनांक २५ सप्टेंबर २०२२ पर्यत सादर करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही जालना जिल्ह्यातील रहिवासी असाल तर प्रस्ताव सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत तुमचा प्रस्ताव सादर करून द्या.

तुम्ही जर जालना जिह्याबाहेरील शेतकरी असाल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा आणि गोदाम बांधकाम अनुदान योजना विषयी अधिक माहिती जाणून घ्या.

jalna godam yojna योजनेची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

गोदाम अनुदान मर्यादा किती आहे

दिनांक २५ सप्टेंबर २०२२ हि गोदाम बांधकाम योजनेचा प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख आहे.

गोदाम बांधकाम अनुदान मर्यादा किती आहे?

१२.५० लाख एवढा निधी गोदाम अनुदान योजनेसाठी मिळणार आहे.

अर्ज कोठे कराल?

संबधित तालुक्याच्या कृषी कार्यालयामध्ये गोदाम योजनेसाठी अर्ज करता येतो.

Leave a Comment