मुग बाजार भाव मुगाला मिळतोय 8.50 हजाराचा भाव.

जाणून घ्या मुग बाजार भाव . जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून मुग पिकांच्या भावत वाढ झालेली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाला सध्या जास्तीत जास्त ८.५० हजार तर सरासरी ६८५० रुपयांचा बाजार भाव मिळत आहे.

तुरीचा प्रती क्विंटल भाव देखील सरासरी ६८०० रुपयापर्यंत मिळत आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी मुगाची २४२ पोते आवक झाल्याचे कळते. सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील नवीन मुग मोंढ्यात विक्रीस येण्यास सुरुवात झाली आहे.

पहिल्या टप्यात दर ८.५० हजार पर्यंत गेले आहेत याचे कारण म्हणजे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे बाजार भावामध्ये वाढ झालेली आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना 3.50 लाख मिळणार.

जालना मुग बाजार भाव  व इतर भाव

पांढऱ्या तुरीला कमाल ७२५० रुपयांचा दर मिळाला असून यामुळे शेतकरी बांधवांमध्ये थोडा उत्साह जाणवला आहे. हे तर आणखी वाढतील अशी अशा करूयात.

जालना शहरातील मोंढा परिसरात सोयाबीनची सुमारे ६६० क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला सरासरी ५१५० रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला आहे. तसेच बाजार समितीमध्ये गहू, मका, ज्वारी, हरभरा या मालांची आवकही स्थिर आहे.

गव्हाचा भाव म्हणाल तर कमाल २६०० तर किमान २३२१ एवढा होता. मका पिकाला २५०० तर किमान २०११ रुपयांचा दर मिळालेला आहे. बाजरीला कमाल २३२१ तर किमान २१०० रुपयांपर्यतचा भाव मिळत आहे.

दरम्यान जालना मोंढ्यात ज्वारीची आवक ८०० ते ८५० पोते आहे. जालना मोंढ्यात पांढऱ्या रेशीम कोषाला कमाल ५७ हजार तर सरासरी ४४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला आहे.

बाजार समितीमध्ये सध्या स्थानिक भाजीपाल्याची आवक होत आहे. मात्र पावसामुळे भाजीपाला खराब होत असून दर चांगले मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मेथी, कोथिंबीरीची आवक कमी असल्याने प्रती शेकडा दर चांगला मिळत आहे.

तर शेतकरी बंधुंनो तुमच्याकडे देखील मुग किंवा वरील उल्लेख केलेले पिके असतील तर बाजार भावाचा अंदाज लावून तुम्ही तुमचा माल बाजारात विक्रीसाठी आणू शकता.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत मुग या मालाला मिळत असलेला बाजार भाव संदर्भातील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment