जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची 50 हजार प्रोत्साहन अनुदान 2022 यादी आली असून बँकेच्या २६,२२३ खातेदारांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान रक्कम देण्यात येणार आहे.
जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
जालना जिल्ह्याचा जर विचार केले तर २६ हजार शेतकरी या प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरलेले आहेत. जालना जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या विविध शाखांमधील २६,२२३ खातेदारांची माहिती बँकेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे.
पुढील योजना पण पहा मिनी ट्रॅक्टर योजना 3.50 लाख मिळणार.
२६,२२३ शेतकरी 50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी मध्ये समाविष्ट
या यादीमधील पात्र लाभार्थ्यांची छाननी करून अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २६,२२३ शेतकरी प्रोत्साहन योजनेसाठी पात्र ठरले आहेत. म्हणजेच आता या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.
५० रुपये प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठी लवकरच विशिष्ठ क्रमांकासह आधार प्राधिकरण पूर्ण झाल्यानंतर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.
तालुका | पात्र शेतकरी |
---|---|
अंबड | १०३० |
बदनापूर | ३२०७ |
भोकरदन | ८०४१ |
घनसावंगी | २५३१ |
जाफ्राबाद | ४०४७ |
जालना | ४८१ |
मंठा | ३०४७ |
परतूर | ३८३८ |
एकूण | २६२२३ |
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या संदर्बातील खालील बातमी पहा
जालना जिल्ह्यातील या लाभार्थींना मिळणार 50 हजार प्रोत्साहन अनुदान
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजना योजनेचा लाभ दिल्यानंतर जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात त्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला गेला होता.
त्यामुळे जे शेतकरी नियमितपणे बँकेचे घेतलेल्या कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचे शासनाने जाहीर केलेले आहे.
या संदर्भात शासनाने वेळोवेळी जी आर देखील काढलेले आहेत. जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँकांना देखील त्यांच्याकडील या योजेसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून ती बँकेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
याचाच एक भाग म्हणून जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेने आघाडी घेत २६,२२३ शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे. इतर बँकाकडून मात्र या प्रक्रियेस थोडा उशीर होतांना दिसत आहे.
संबधित जिल्ह्याच्या बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध अपलोड होतील याद्या
अल्पमुदत पिक कर्जाची रक्कम पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर अशावेळी शेतकऱ्यांनी घेतलेल्या मुद्दल रक्कम विचारत घेतली जाणार आहे आणि त्या रकमेएवढा निधी त्या शेतकऱ्यास दिला जाणार आहे.
५० प्रोत्साहन योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ज्या त्या बँकेच्या संकेतस्थळावर अपलोड होणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर जालना जिल्ह्याबाहेरील शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्यासाठी जी बँक आहे त्या बँकेच्या संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईटवर या याद्या अपलोड केल्या जाणार आहेत.त्या ठिकाणी भेट देवून तुम्ही या याद्या बघू शकता.