व्यायाम शाळा प्रस्ताव स्वीकारणे सुरु pdf  प्रस्ताव डाउनलोड करा

जालना जिल्ह्यामध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,  प्रचार , प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण  करण्याचे अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना मार्फत व्यायामशाळा  अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

त्यामुळे तुम्ही जर जालना जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि तुम्हाला तुमच्या गावामध्ये शासकीय अनुदानावर व्यायाम शाळा घ्यायची असेल तर १ ते ९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान प्रस्ताव सादर करून द्या.

व्यायाम शाळा प्रस्ताव pdf  मध्ये हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून हा प्रस्ताव डाउनलोड करून घ्या.

पुढील माहिती पण वाचा मिनी ट्रॅक्टर योजना 3.50 लाख मिळणार.

व्यायाम शाळा प्रस्ताव मोफत डाउनलोड करा

जालना जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील गावांमध्ये व्यायाम शाळा नसल्याने अनेक तरुणांमध्ये नाराजी व्यक्त होतांना दिसत आहेत.

ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण सैन्य भरती व इतर भरतीसाठी तयारी करत असतात. अशावेळी जर त्यांना व्यायाम करण्यासाठी सोईसुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध करून दिल्या तर भरतीची तयारी करण्यासाठी त्यांना अधिक सोपे होईल.

हल्ली सोशल मिडीयाच्या जमान्यामध्ये तरुणाई मोबाईलमध्ये व्यस्त आहे. यामुळे तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीवर फार मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होत आहे.

दररोज व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते. व्यायामाची सवय लागल्याने शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहते.

प्रसन्न मनामध्येच सकारात्क विचार येतात आणि सकारात्मक विचारातून चांगले कार्य घडते. त्यामुळे मानवी जीवनामध्ये व्यायामास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.

शहरामध्ये व्यायाम करण्याची सुविधा असते परंतु ग्रामीण भागामध्ये त्या दृष्टीने कमी प्रमाणत सुविधा उपलब्ध आहेत. बऱ्याच गावामध्ये अजूनही व्यायाम शाळा उपलब्ध नाहीत. याचे प्रमुख एक कारण म्हणजेच ग्रामपंचायत कडे नसलेला निधी.

व्यायाम शाळा बांधकामासाठी मिळेल अनुदान.

याच बाबीचे महत्व अधोरेखित करून आता ग्रामीण भागामध्ये व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे ग्रामीण भागातही व्यायाम शाळेमुळे तरून व्यायाम करू शकेल आणि त्यांचे आरोग्य चांगले राहू शकेल.

तुमच्याही गावामध्ये अजूनही व्यायाम शाळा नसेल तर यासाठी प्रस्ताव सादर करून द्या.  प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ असा आहे.

प्रस्ताव डाउनलोड करण्याची लिंक देखील वरती दिलेली आहे या लिंकवर क्लिक करून व्यायाम शाळा प्रस्ताव pdf दुन्लोड करून घ्या आणि त्या पद्धतीने विहित नमुन्यामध्ये आणि दिलेल्या तारखेच्या आत प्रस्ताव सादर करून द्या जेणे करून तुम्हाला व्यायाम शाळा बांधकाम अनुदान मिळू शकेल.

या संदर्भातील बातमी देखील बघू शकता. व्यायाम शाळा अनुदान योजना संदर्भातील अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडाधिकारी जालना यांच्या कार्यालयास भेट द्या.

Leave a Comment