राष्ट्रीय कृषी विकास योजना Rashtriya Krishi Vikas Yojana scheme अंतर्गत शेतकरी बांधवाना ९० टक्के अनुदानावर तुषार व ठिबक संच मिळणार आहेत.
हि योजना केवळ जालना जिल्ह्यासाठीच नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी बांधव या योजनेसाठी त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून द्यावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा, कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळते या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी ज आणून घेणार आहोत. त्यामुळे हि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या योजनांचा लाभ घ्या.
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मिळणार ९० टक्के अनुदानावर ठिबक व तुषार संच.
जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना Rashtriya Krishi Vikas Yojana scheme अंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
सूक्ष्म सिंचन योजना ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी सन 202223 साठी अनुसूचित जातीसाठी एक कोटी व अनुसूचित जमातीसाठी 23 लाख निधी उपलब्ध झाला आहे.
जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर तातडीने अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचनासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार ५५ ते ४५ टक्के लाभ
अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांसाठी अनुदेय खर्चाच्या 55% अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या 55% यापैकी कमी असेल ते दिले जाणार आहे.
बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी खर्चाच्या 45% अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या 25 % यापैकी कमी असेल ते अनुदान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून तर अनुदान 90% साठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे.
तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना babasaheb ambedkar krushi swavalamban yojana अंतर्गत ज्या लाभार्थीचे नवीन सिंचन विहिरीसाठी कामे पूर्ण केली आहेत त्यांच्यासाठी 90% अनुदान देय आहे तरी अनुसूचित जाती व जमातीच्या पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
ठिबक व तुषार सिंचन पद्धतीमुळे कृषी क्षेत्रामध्ये क्रांती
कृषी क्षेत्रामध्ये ठिबक व तुषार सिंचन पद्धतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आलेली आहे. ठिबक व तुषार सिंचन पद्धतीमुळे शेतकरी बांधवाना कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेता येते.
बऱ्याच शेतकरी बांधवांच्या विहिरींना उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही. अशावेळी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केले तर अगदी कमी पाण्यामध्ये उत्पादन घेता येते.
अशाच पद्धतीने तुषार सिंचनचा उपयोग करून देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येते. अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामध्ये ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धत वापरण्याची इच्छा असते.
विशेषतः ज्या शेतकरी बांधवांकडे माळरान जमीन आहे त्या शेतकरी बांधवांसाठी तुषार आणि ठिबक पद्धती खूपच गरजेची आहे.
ऑनलाईन करावा लगतो अर्ज
तुषार व ठिबक संच खरेदी करण्यासठी लागणारा पैसा त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने ते हे संच विकत घेवू शकत नाहीत. अशावेळी हे संच शासकीय अनुदानावर शेतकरी बांधव खरेदी करू शकतात. त्यासाठी शेतकरी बांधवाना महाडीबीटी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
ठिबक सिंचन किना तुषार सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो आणि कोणत्या वेबसाईटवर करावा लागतो या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते.
केवळ माहिती न मिळाल्याने अनेक शेतकरी बांधव तुषार सिंचन योजना tushar sinchan yojana व ठिबक सिंचन योनेचा thibak sinchan yojana लाभ घेवू शकत नाहीत.
इतर योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मिळणार लाभ
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत rashtriya krishi vikas yojana scheme आता शेतकरी बांधावा ठिबक सिंचन योजना व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. यासाठी ९० अनुदान असल्याने अगदी कमी पैशांमध्ये ठिबक किंवा तुषार संच खरेदी करता येणार आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ठिबक व तुषार संचासाठी केवळ १० टक्के रक्कम भरावी लागणार असल्याने अनेक शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेवू इच्छित आहेत.
त्यामुळे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे हे जाणून घेणे शेतकरी बांधवांसाठी खूप गरजेचे असणार आहे.
जाणून घेवूयात या राष्ट्रीय कृषी विकास योजना योजना संदर्भातील संपूर्ण माहिती.
ऑनलाईन अर्ज प्रोसेस
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ९० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन व तुषार सिंचन खरेदी करण्यासाठी शासकीय अनुदान हवे असेल तर शेतकरी बांधवाना महाडीबीटी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शेतकरी बांधवाना या योजनांचा लाभ मिळतो. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ठिबक किंवा तुषार योजनेचा अर्ज करण्यासठी कोणतेही विशेष लायसन्स किंवा आयडी लागत नाही.
शेतकरी बांधव स्वतः त्यांचा ठिबक व तुषार सिंचन योजनेचा अर्ज करू शकतात. हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील एक व्हिडीओ खाली दिलेला आहे. तो व्हिडीओ बघा आणि त्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.
ऑनलाईन अर्ज कसा करावा त्या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर शेतकरी बांधवाना त्यांच्या मोबाईल नंबरवर योजनेत निवड झाली असेल तर संदेश येतात. निवडीचा संदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही करावी.
तर अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईअर्ज कसा करावा या संदर्भातील माहिती जाणून घेतलेली आहे.
केवळ शासकीय योजनेचा लाभ मिळतो म्हणून अर्ज करणे योग्य नव्हे.
शासकीय अनुदान मिळते म्हणून अनेकजण अर्ज करतात. यामागचा उद्देश म्हणजे योजनेसाठी मिळणारी सबसिडी. अनेक लाभार्थ्यांनी त्यांना शासकीय अनुदानावर मिळालेले ठिबक व तुषार संच इतरांना दिल्याचे अनेक वृत्त वाचायास मिळाले. त्यामुळे केवळ शासकीय योजना आहे म्हणून ठिबक किंवा तुषार संच खरेदी करणे योग्य नव्हे.
पाण्याची बचत करण्यासाठी तुषार आणी ठिबक सिंचनाचा खूप मोठा फायदा होतो. यामुळे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पाणी बचतीबरोबरच उत्पादनात देखील वाढ होते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
ठिबक व तुषार सिंचन योजनेचा अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा लागतो?
राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ठिबक व तुषार योजनेचा ऑनलाइन अर्ज सादर करवा लगतो. शेतकरी स्वतः देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
ठिबक व तुषारसाठी किती अनुदान मिळते?
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ठिबक संच व तुषार संच खरेदी करण्यासठी ९० टक्के अनुदान दिले जाते.
कागदपत्रे कोणकोणती लागतात?
सर्वसाधारणपणे सातबारा, एकूण जमिनीचा दाखला म्हणजेच ८ अ हि कागदपत्रे योजनेत निवड झाल्यावर अपलोड करावी लागतात. साहित्य खरेदी केल्यावर बिल अपलोड करावे लागते.
किती दिवसात मिळते अनुदान.
कृषी अधिकारी यांचेकडून शेतकरी बांधवानी खरेदी केलेल्या तुषार संच किंवा ठिबक संचाची पाहणी केल्यावर साधारणपणे १ महिन्याच्या आत अनुदान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते. हा कालावधी कमी किंवा जास्त देखील होऊ शकतो.
योजनेचे स्वरूप कसे आहे?
शेतकरी बांधवाना त्यांच्या जमिनीचे तपशील, बँकेचे तपशील व इतर माहिती सादर करून नोंदणी करावी लागते. त्यानंतर युजर आयडी पासवर्ड मिळतो. लॉग इन करून शेतकरी बांधव ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जर योजनेत निवड झाली तर त्यांना तसा संदेश पाठविला जातो.