राजूर गणपती मंदिर विकास कामासाठी 5 कोटी निधी

जालना जिल्ह्यातील महत्वाचे दैवत म्हणजेच राजूरचा गणपती. राजूरच्या गणपती मंदिर विकास कामासाठी आता शासनाच्या वतीने ५ कोटी एवढा निधी देण्यात आलेला आहे.

या संदर्भातील शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आलेला आहे.

चतुर्थी निमित्त संपूर्ण जालना जिल्ह्यातूनच नव्हे तर जालना जिल्ह्याचे बाहेरून देखील नागरिक राजूरच्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी येतात.

राजूर गणपती मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी शासनाच्या वतीने निधी वितरीत करण्यात आलेल आहे.

श्री क्षेत्र राजूर गणपती मंदिर हे जालना जिल्ह्यातील नावाजलेले तीर्थक्षेत्र आह. राजूर ते जालना अंतर rajur ganpati to jalna distance केवळ २८ किलोमीटर आहे. यामुळे भाविकांना जालना शहरापासून राजूर येथे येण्यास अनेक सुविधा आहेत.

पुढील लेख पण वाचा राष्ट्रीय कृषी विकास योजना 90 % अनुदान मिळणार

राजूर गणपती मंदिर विकास कामासाठी 5 कोटी निधी संदर्भातील जी आर पाहा

राजूर गणपती मंदिर विकासासाठी २३.९६ कोटी (२३९६ लक्ष) चा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यापैकी ७.४५ कोटी निधी (७४५.०६ लक्ष) अगोदरच वितरीत करण्यात आलेला आहे. दिनांक १ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार ५ कोटी एवढा निधी आता वितरीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

या संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शासन निर्णय पहा

मंदिर परिसरामध्ये विकास कामांसाठी मिळाला निधी.

राजूर गणपती मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगली कामे होणे अपेक्षित आहेत.

राजूर गणपती दैवत जालना जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी

दर महिन्याला चतुर्थी निमित्त अनेक भाविक जालना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून राजूर येथे गणपती दर्शनासाठी पोचतात. यामध्ये अनेक भाविक पायी चालत येत असतात.

पायी आलेल्या भाविकांसाठी चांगला भक्त निवास आणि त्याप्रमाणे इतर सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा ग्रामीण भागातील देवदर्शनासाठी भक्तांना होऊ शकतो.

गणपती तीर्थक्षेत्रामुळे हा तालुका राजूर गणपती तालुका म्हणून ओळखला जातो. शासनाच्या वतीने दिल्या गेलेल्या या निधीमुळे लवकरच विविध विकास कामे होतील आणि श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर विकास होईल अशी अशा करूयात.

Leave a Comment