शेळी पालन कुक्कुटपालन योजना अर्ज सुरु

ज्या शेतकरी बांधवाना किंवा पशुपालकांना शेळी पालन कुक्कुटपालन योजना sheli palan kukkut palan yojana व इतर योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी अर्ज करून द्यावे.

जालना जिल्ह्यामधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शेती पूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत किती अनुदान दिले जाते, त्यासाठी कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. अर्ज ऑफलाईन आहे कि ऑनलाईन आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला या योजनेचा अधिक चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत pashusavardhan vibhag yojana केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्याने विविध योजना राबविल्या जातात. या शेळी पालन कुक्कुटपालन योजना द्वारे शेती पूरक व्यवसाय करण्यास शेतकरी बांधवाना अनुदान दिले जाते.

शेळी पालन कुक्कुटपालन योजना रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतात.

याचाच एक भाग म्हणून 2022 2023 या वर्षापासून केंद्र शासनाने पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान केली आहे.

जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत अशा सर्व शेतकरी बांधवानी या राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जालना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये नोकरीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे विशेषतः ग्रामीण भागातील बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस खूपच वाढत चालली आहे.

अशावेळी नोकरी मिळाली तर ठीक आहे नाहीतर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसाय करून ग्रामीण भागात चांगल्या प्रमाणात रोजगार निर्माण केला जावू शकतो.

ग्रामीण भागामध्ये अंडी, मास आणि दुधास चांगली मागणी आहे. यासाठी दुग्धव्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसायास चांगला वाव निर्माण झाला आहे.

बरेच शेतकरी बांधव शेळी पालन कर्ज योजना किंवा शेळी पालन कुक्कुटपालन योजना संदर्भात माहिती जाणून घेण्यास इच्छुक असतात त्यामुळे अशा शेतकरी बांधवांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

पुढील योजना पण पहा राष्ट्रीय कृषी विकास योजना 90 % अनुदान मिळणार

योजनेच्या अनुदान संदर्भात माहिती.

दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय व मुरघास निर्मितीसाठी अर्ज करावेत असे आवाहन जालना कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कोणत्या व्यवसायासाठी किती निधी मिळणार आहे ते खालीलप्रमाणे दर्शविले आहे.

सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत दुग्धव्यवसाय, शेळीमेंढी पालन, कुक्कुटपालन, वराह पालन व मूर घास निर्मितीसाठी खालील पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे.

  • कुक्कुटपालन – २५ लाख रुपये.
  • शेळीपालन व मेंढी पालन व्यवसाय – ५० लाख रुपये
  • वराह पालनसाठी – ३० लाख रुपये.
  • मूरघास निर्मितीसाठी – ५० लाख रुपये

शासनाच्या वतीने वरील योजनांसाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी सर्वसामावेश मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारले जाणारे प्रश्न व अर्जाचा नमुना इत्यादी शासनाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

शेळी पालन कुक्कुटपालन योजना संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जालना यांच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हि योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविली जाते त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा.

जाणून घेवूयात या योजनेसाठी लागणारी पात्रता

शेळी पालन कुक्कुटपालन योजना राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत खालील घटक लाभ घेवू शकतात.

  • व्यक्तिगत व्यावसायिक.
  • स्वयंसहायता बचत गट.
  • शेतकरी उत्पादक संस्था.
  • कलम आठ अंतर्गत स्थापन झालेली कंपनी.
  • शेतकरी सहकारी संस्था.
  • सहकारी दूध उत्पादक संस्था.
  • सह जोखीम गट.
  • सहकारी संस्था.
  • खाजगी संस्था.
  • स्टार्टअप ग्रुप.

तुम्ही वरीलपैकी एक संस्था किंवा व्यक्ती असाल तर या राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि शेळी पालन व्यवसाय, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय वराह पालन किंवा मुरघास निर्मिती प्रकल्पासाठी अनुदान मिळवू शकता.

योजनेसाठी मिळणार ५० टक्के अनुदान

शेळी पालन कुक्कुटपालन योजना व वरील उल्लेख केलेल्या योजनांसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जाते हि बाब या ठिकाणी लाभार्थींनी लक्षात घ्यावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी जालना जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त कार्यालय किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यातील असला त्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाच्या पशुपालन व डेअरी विभाग वेबसाईटला भेट द्यावी.

ऑनलाईन अर्ज लिंक.

या योजनेसंदर्भात शासनाच्या वेबसाईटवर सर्व प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याआधी शासनाच्या संकेतस्थळावरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.

पूरक व्यवसायातून होईल रोजगार निर्मिती.

शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन इत्यादी शेती पूरक व्यवसायातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगार मिळू शकल्याने शहराकडे रोजगारासाठी लागणारी रंग कमी होऊ शकते.

दुधावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळे पदार्थ निर्मितीचा व्यवसाय देखील करता येते आणि त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे तुम्ही जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा महाराष्ट्रतील कोणत्याही जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही शेळी पालन कुक्कुटपालन योजना अंतर्गत शेतीपूरक व्यवसाय करू इच्छित असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

या व्यतिरिक्त जिल्हा परिषद योजना जालना zp yojana jalna व पंचायत समिती योजना जालना panchayat samiti yojana jalna संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

शेळीपालन योजनेसाठी किती अनुदान मिळते?

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेळीपालन प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळते.

शेळी योजना किंवा कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

शेळीपालन योजना, कुक्कुटपालन योजना व इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास ऑनलाईन अर्ज करा लागणार आहे. हा अर्ज कसा आणि कोणत्या वेबसाईटवर करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

या योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत?

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी कोणकोणत्या व्यक्ती किंवा संघटना अर्ज करू शकतात त्या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. हा लेख वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल.

Leave a Comment