घरकुल बांधकाम न करणाऱ्यांना पैसे करावे लागणार परत

घरकुल बांधकाम न करणाऱ्यांना पैसे परत सरकारी खात्यामध्ये जमा करावे लागणार आहे. शिवाय कारवाई होणार आहे ते हेलपाटे वेगळे असणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. तुम्ही देखील घरकुल बांधकाम योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही अजूनही तुमच्या घराचे बांधकाम सुरु केले नसेल तर हि माहिती नक्की वाचा.

एकीकडे आम्ही गरीब आहोत आम्हाला घरकुलासाठी शासकीय अनुदान द्या अशी ओरड असते तर एकीकडे घरकुल मंजूर होऊन देखील घरकाम केले जात नाही असे चित्र पहावयास मिळते.

जालना जिल्ह्यातील भोकरदन पंचायत समितीने मंजूर केलेल्या विविध योजनांतील 2960 घरकुलांची कामे मंजूर झालेली आहेत. घरकुल मंजूर झाल्यानंतर काही लाभार्थींना घरकुल बांधकामाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यात आलेला आहे.

घरकुल बांधकामासाठीचा पहिला हफ्ता बँक खात्यामध्ये जमा होऊन देखील काहीं लाभार्थ्यांनी पाच वर्षापासून घरकुल बांधकामाची कामे सुरू केलेली नाहीत त्यामुळे घरकुल बांधकाम न करणाऱ्यां लाभार्थ्यांना आता पैसे परत करावे लागणार आहेत.

पुढील लेख पण वाचा राष्ट्रीय कृषी विकास योजना 90 % अनुदान मिळणार

घरकुल बांधकाम न करणाऱ्यांना सामना करावा लागेल शासकीय कारवाईचा

अनेक लाभार्थींनी घरकुल बांधकामासाठी आलेला पहिला १५ हजार रुपयांचा हफ्ता घेवून देखील अद्याप घराचे बांधकाम सुरु केले नाही.

अशा लाभार्थींना भोकरदन पंचायत समितीने नोटीसा बजावल्या असून तातडीने कामे पूर्ण करा अन्यथा शासकीय रक्कम वसुलीसाठी आपल्या मिळकतीवर बोजा टाकण्याचा इशारा या नोटीसीद्वारे केला आहे.

घरकुल बांधकाम करण्याचा इशारा देण्यात आल्याने लाभार्थीमध्ये खळबळ उडाली आहे. सरकारचे पैसे घेऊनही घरकुलाचे काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्याच्या विरुद्ध घरकुलांची मंजुरी रद्द करणे, सरकारी पैसे पुन्हा सरकार खाती जमा करून घेणे, पैसे परत न करणाऱ्या व काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्याविरुद्ध गुन्हे दाखल करणे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

शासकीय अनुदान मिळूनही घरकुल बांधकाम न केल्याने होणारी कारवाई टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी सात दिवसाच्या आत घरकुल बांधकाम सुरू करणे गरजेचे आहे अन्यथा पंचायत समिती भोकरदन यांच्याकडून कार्यवाही होऊ शकते.

एकीकडे राहायला घर मिळत नाही सरकारने मदत करावी अशी मागणी होते आणि दुसरीकडे घरकुल बांधकाम मंजुरी देऊन व 15 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देऊनहि बांधकाम सुरु केले जात नसल्याने प्रशासन जेरीस आले आहे.

पुढील योजना पण बघा मिनी ट्रॅक्टर योजना 3.50 लाख मिळणार.

घरकुल बांधकाम न करणाऱ्या लाभार्थींना नोटीस

भोकरदन तालुक्यात पंतप्रधान घरकुल योजनेचे 2016 ते 2022 पर्यंत 5142 घरकुलांना पंचायत समितीने मंजुरी दिली आहे. यामधील 3725 घरकुलांची कामे पूर्ण झाले असून त्याचे पैसे लाभार्थ्यांना मिळाले देखील आहेत. आहेत मात्र 2016 ते 2021 पर्यंतचे 318 घरकुले 15000 रुपयांचा पहिला हप्ता घेऊनही अद्याप सुरू झालेली नाहीत.

ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठीचा शासकीय हफ्ता आलेला आहे परंतु त्यांनी अजून घरकुल बांधकाम सुरु केलेले नाही अशाना गट विकास अधिकारी ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी लेखी नोटीसा पटवले आहेत.

आता या लाभार्थ्यांना घरकुल सुरू करा अन्यथा पैसे परत करा अशी अंतिम नोटीसही बजावली आहे. लोक अदालतीमध्ये नोटीसा देऊन झाले आहेत या लाभार्थ्यांना आता सात दिवसात निर्णय घ्या अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याने सांगण्यात आले.

पैसे वसुलीसोबत होऊ शकतो गुन्हा दाखल.

सर्व लाभार्थ्यांना पंचायत समिती प्रशासनाने वेळोवेळी लेखी सूचना व नोटीसा दिलेल्या आहेत तरीसुद्धा घरकुल बांधकामाची कामे सुरू झालेली नाहीत. आता लाभार्थ्यांना एक तर काम सुरू करावे लागणार आहे किंवा घरकुल बांधकामासाठी मिळालेले तरी पैसे परत करावे लागणार आहे.

घरकुल बांधकाम मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे त्यानंतर मात्र पैसे वसूल करून थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी पंचायत समिती प्रशासनने केली आहे.

त्यामुळे आता घरकुलाचे पैसे घेतले मात्र चार ते पाच वर्षापर्यंत वेळ जाऊनही काम सुरू केले नाही अशा लाभार्थ्यांचे अवसान गाळलेले आहे. आता गुन्हे दाखल होणार असल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पैसे भरूनही गुन्हे दाखल झाले तर त्यांना कारवाईसाठी पुन्हा हेलपाटे मारावे लागणार आहे.

बातमी पहा

भोकरदन पंचायत समिती घरकुल बांधकाम योजना संदर्भातील लेखा जोखा.

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत 2016 ते 2021 या कालावधीमध्ये 1742 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1731 कामे सुरू झालेली असून 234 कामे सुरू झालेली नाहीत.

दुसऱ्या टप्प्यात 1497 तर तिसऱ्या टप्प्यात 10442 यापैकी 128 घरकुलांचे स्लॅब पातळीपर्यंत कामे पूर्ण झालेली आहेत.

चौथ्या टप्प्यात 1324 यापैकी 1424 घरकुलांची कामे  पूर्ण झालेली असून 318 कामे अपूर्ण आहेत.

शासनाच्या वतीने गरीब जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्याचा उद्देश म्हणजे गरीब जनतेला सुविधा मिळवून देणे होय.

योजनेचा योग्य पद्धतीने लाभ घेणे महत्वाचे.

एखादी योजना जर मंजूर झाली तर त्या योजनेचा त्या योजनेच्या निकषानुसार लाभ घेणे गरजेचे आहे. परंतु काही लाभार्थी योजनेचा लाभ न घेता योजनेसाठी मिळालेलं पैसा इतर दुसऱ्याच नावाखाली खर्च करतात.

अशावेळी अशा लाभार्थ्याविरोधात कडक कारवाई करणे गरजेचे आहे जेणे करून ते योजनेचा योग्य पद्धतीने लाभ घेवू शकतील.

घरकुल मिळविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये खूप मोठी स्पर्धा बघावयास मिळते. परंतु जेंव्हा घरकुल बांधकाम करण्याची वेळ येते तेंव्हा मात्र पहिला हफ्ता मिळाल्यावर नंतर लाभार्थी टाळाटाळ करतांना दिसतात.

त्यामुळे भोकरदन पंचायत समितीने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य आहे असे म्हणता येईल.

Leave a Comment