अंगणवाडीमध्ये पोषण ट्रॅकर ॲप अपडेट करण्याची मागणी

अंगणवाडीमध्ये पोषण ट्रॅकर ॲप

ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ग्रामीण भागातील लहान मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी अंगणवाडीसाठी शासन विविध योजना राबवीत असते.

सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने काम सुरु आहे. त्यामुळे अंगणवाडी देखील अपडेट होत आहे. अंगणवाडीमध्ये सुरु असलेल्या कामकाजाची नोंद पोषण ट्रॅकर ॲपमध्ये केली जाते.

परंतु सध्या हे ॲप इंग्रजीमध्ये असल्याने अनेक अंगणवाडी ताईना वापरण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आता मराठी भाषेत माहिती भरली जाणार आहे.

परंतु सध्या हे ॲप अपडेट नसल्याने अनेक अंगणवाडी ताईना वापरण्यास अडचण येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ॲप अपडेट करण्याची मागणी जोर धरत आहे.

anganwadi poshan tracker app

अंगणवाडीमध्ये लहान बालकांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये बालकांची तपासणी, सकस आहार वाटप तसेच ज्या महिला गर्भवती आहेत त्यांची तपासणी व इतर माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सादर केली जाते.

पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सादर केली जाणारी माहिती युनिकोड लिपीचा वापर करून सादर केली जाते. युनिकोड मध्ये इंग्रजी अक्षरे टाईप केले कि ते आपोआप मराठी मध्ये रुपांतरीत केले जाते. त्यामुळे अंगणवाडी ताईसाठी हि माहिती सादर करणे अगदी सोपे जाणार आहे.

अंगणवाडीमध्ये लहान मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी शासनस्तरावासरून विविध शालेली साहित्य, त्याचप्रमाणे पोषण आहार व इतर सुविधा पुरविली जाते. जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण २०३० अंगणवाड्या सुरळीत सुरु आहेत.

या अंगणवाड्यामधून गर्भवती मतांची तपासणी बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पोषण आहार व इतर विविध कामे केली जातात.

पोषण ट्रॅकर ॲप

इंग्रजी अक्षरे टाईप केल्यानंतर मराठीमध्ये त्याचे रुपांतर होते. हि प्रोसेस पूर्वीपासूनच सुरु आहे. मात्र ॲप मधील इतर माहिती अद्यापहि इंग्रजीमध्येच असल्याने अंगणवाडी ताईना हे ॲप वापरण्यास अडचण निर्माण होते.

जालना जिल्ह्यातील २०३० अंगणवाड्या आहेत ज्यामध्ये कार्यरत सेविकांची संख्या १९०० एवढी आहे. त्याचप्रमाणे १३४९ एवढी संख्या अंगणवाडी मदतनिसांची असून सध्या ते कार्यरत आहेत.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर्जा खालावल्याने अनेक जन सध्या शिक्षणासाठी शहरामध्ये जाताना दिसत आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागातच जर दर्जेदार शिक्षण मिळाले तर ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही.

दैनंदिन जीवनामध्ये कॉम्पुटर तसेच मोबाईल ॲप्सचा वापर वाढला असून त्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये अधिक गती निर्माण होत आहे.

त्यामुळे आता अंगणवाडी असो कि महाविद्यालय प्रत्येक ठिकाणी ह्या तांत्रिक बाबींचे ज्ञान अवगत करणे गरजेचे झालेले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment