जालना कृषी प्रदर्शन रविवारपासून Jalna krushi mahotsav

जालना कृषी प्रदर्शन अर्थात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कृषी प्रदर्शन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे.

कृषी प्रदर्शन म्हटले कि शेतकरी बांधवांसाठी मेजवानीच असते. जालना कृषी प्रदर्शन 23 ते 27 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते परंतु काही कारणास्तव प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

विविध राजकीय तसेच शासकीय अधिकारी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत हे कृषी प्रदर्शन रविवार २६ मार्च पासून जालना शहरातील गोरक्षण समितीच्या पांजरपोळ मैदानावर सुरु होणार आहे.

जालना जिल्हा तसेच जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी या कृषी प्रदर्शनामध्ये खूपच महत्वाची माहिती मिळणार असल्याने तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्कीच हे कृषी प्रदर्शन तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

पुढील लेखपण वाचा राष्ट्रीय कृषी विकास योजना 90 % अनुदान मिळणार

जालना कृषी प्रदर्शन शेतकरी बांधवांसाठी ठरणार महत्वाचा

भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे कृषी संदर्भात शेतकरी बांधवाना जेवढी जास्त उपयुक्त माहिती मिळेल शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे किंवा पिक संदर्भातील इतर बाबींसाठी जास्त फायदा शेतकरी बांधवाना मिळेल.

कृषी महोत्सव किंवा कृषी प्रदर्शन कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केले जातात. या महोत्सवात विविध कृषी उत्पादने दाखविली जातात. शेती संबधित उत्पादनांचे बाजारभाव आणि विविध कृषी तंत्रांचे तपशीलवार ज्ञान शेतकरी बांधवाना या प्रदर्शनात दिले जाते.

किसान कृषी महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी उत्पादक आणि शेतकरी यांच्यात समन्वय निर्माण करणे होय. जेणेकरून त्यांना नवीन तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि विकसित उत्पादनांची माहिती मिळू शकेल.

याशिवाय हा महोत्सव कृषी उत्पादनांची निर्मिती, विपणन आणि विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.

जालना कृषी प्रदर्शन jalna krushi pradarshan

शेतकरी कृषी प्रदर्शन किंवा कृषी महोत्सव हा सहसा राज्य पातळीवर आयोजित केला जातो ज्यामध्ये कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, कृषी तंत्रांचे प्रात्यक्षिक, बाजारभाव, चर्चासत्रे आणि व्याख्याने इत्यादींचा समावेश असतो.

त्यामुळे तुम्ही जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्हाला या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच या प्रदर्शनाला भेट द्या. जालना कृषी प्रदर्शन संदर्भातील माहिती आपल्या मित्रांना पाठवा.

जालना जिल्हा परिषद शेतकरी योजना तसेच इतर महत्वाच्या माहितीसाठी या पोर्टलला भेट देत राहा तसेच हि माहिती आपल्या शेतकरी बांधवाना शेअर करायला विसरू नका.

कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment