Mukhyamantri rojgar nirmiti karykram : तुम्ही जर जालना जिल्ह्यातील तरुण तरुणी असाल आणि तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला रोजगाराची संधी चालून आलेली आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान मिळणार आहे. किती अनुदान मिळणार आहे,कोणत्या व्यक्ती यासाठी पात्र असणार आहेत हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
महाराष्ट्र राज्यातील युवक युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा ताचेच त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पुढील योजना पण पहा राष्ट्रीय कृषी विकास योजना 90 % अनुदान मिळणार
Mukhyamantri rojgar nirmiti karykram 30 लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्ज
जालना जिल्ह्यातील इच्छुक युवक युतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रकल्प व निर्मिती प्रकल्पासाठी जास्तीती जास्त 50 लाख रुपये व सेवा कृषी पूरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पासाठी जास्तीत जास्त 20 लाख रुपये मर्यादा किंमत राहणार आहे.
शहरी भागात जिल्हा उद्योग केंद्र तर ग्रामीण भागासाठी जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय एकत्रित समन्वय व सहनियंत्रण महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ही यंत्रणा अंमलबजावणी या योजनेची अमलबजावणी करते.
10 ते 25 लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण तर 25 लाखांवरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. Mukhyamantri rojgar nirmiti karykram
खालील कागदपत्रे आवश्यक असणार
अर्जदाराचे छायाचित्र
जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र
शैक्षणिक कागदपत्रे
हमीपत्र
प्रकल्प अहवाल
जातीचे प्रमाणपत्र
ग्रामीण भागासाठी लोकसंख्या प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
तुम्ही जर जालना जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि बेरोजगार असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकता.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना संदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्या बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. अशामध्ये तरुणांचा हाताला काम मिळत नसल्याने तरुणांमध्ये नैराश्य येत आहे. उद्योग व्यवसाय करायचा म्हटल्यास त्यासाठी भांडवल असणे आवश्यक असते आणि भांडवल न मिळाल्यामुळे अनेक तरुण त्यांच्या व्यवसाय सुरु करू शकत नाही.
त्यामुळे जे होतकरू तरुण आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कर्यक्रम हि योजना खूपच महत्वाची ठरणार आहे.