जालना जिल्हा वाळू डेपो या 8 ठीकाणी केली जाणार डेपोची निर्मिती.

जालना जिल्हा वाळू डेपो निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झालेली असून आज म्हणजेज दिनक २४ एप्रिल २०२३ पासून निविदा प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे.

घर बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वाळूचे दर खूपच महागले आहेत. आता निविदा प्रक्रिया सुरु झाल्याने हे दर काहीसे नियंत्रणात येतील अशी आशा आहे.

तुम्ही जर जालना जिल्ह्यातील रहिवाशी असाल तर हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण जालना जिल्ह्यामध्ये विविध आठ ठिकाणी वाळू डेपो सुरु होणार आहेत. कोणत्या ठिकाणी जालना जिल्हा वाळू डेपो सुरु होणार आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या. Mukhyamantri rojgar nirmiti karykram जालना जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु

खालील ठिकाणी निर्माण होणार जालना जिल्हा वाळू डेपो

जालना जिल्ह्यात बदनापूर, जाफराबाद, भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा या तालुक्यामध्ये एकूण आठ ठिकाणी वाळू डेपो निर्मिती केली जाणार आहे ते स्पॉट खालीलप्रमाणे आहेत.

  1. सायगाव डोंगर गाव (बदनापूर तालुका).
  2. सावरखेडा (तालुका जाफराबाद).
  3. केदारखेडा (तालुका भोकरदन).
  4. आपेगाव (तालुका अंबड).
  5. पिठोरी सिरसगाव (तालुका अंबड).
  6. रांजणी (तालुका घनसावंगी).
  7. तळणी (तालुका मंठा).

वरीलप्रमाणे विविध ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणी जालना जिल्हा वाळू डेपो निर्मिती केली जाणार आहे.

वाळूचे दर नियंत्रणात येणार

वाळूचे दर मोठ्या प्रमाणत वाढल्याने सध्या सर्वसामान्य नागरिकांना घरांचे बांधकाम करणे अशक्य झाले आहे. वाळूचा लिलाव जालना जिल्ह्यामध्ये सुरु झाला असून याचा नक्कीच सर्व सामान्य नागरिकांना लाभ मिळणार आहे.

वाळू संदर्भात शासनाने नवीन धोरण जाहीर केले असून या नवीन धोरणानुसार वाळूची लिलाव प्रक्रिया

शासनाच्या नवीन धोरणानुसार वाळूची लिलाव प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून 28 वाळू घाटासाठी आठ ठिकाणी डेपो निश्चित करण्यात आले आहेत दोन महिन्यापूर्वी प्रशासनाने पर्यावरण विभागाने अनुमती दिलेल्या 28 वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया जाहीर केली होती परंतु राज्य शासनाने वाळू विक्रीसाठी नवीन धोरण जाहीर केल्यामुळे या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती.

त्यानुसार शासनाने नवीन धोरण आखले असून डेपोद्वारे नागरिकांना वाळू मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यात आठ ठिकाणी डेपो करण्यात येणार आहेत.

वाळू घाटातून वाळू उत्खनन वाळूची डेपोपर्यंत वाहतूक वाळू डेपो निर्मिती व्यवस्थापन व विक्री करण्यासाठी निविदा सोमवारपासून प्रसिद्द करण्यात आली आहे.

तुम्ही देखील घरांचे बांधकाम करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला वाळू हवी असेल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment