मधमाशी पालन योजना अंतर्गत अर्ज  स्वीकारणे सुरु

जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना मधमाशी पालन योजना अर्थात मधुमक्षी पालन योजना अंतर्गत शेती पूरक व्यवसाय करण्याची संधी निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशी पालन योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. पात्र शेतकरी बांधवानी आपापले अर्ज सादर करून द्यावेत.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन किंवा ज्याला मधमाशी पालन हा जोड धंदा करता येतो.  महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवानी मध उद्योग हा केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता मुख्य उद्योग म्हणून करणे गरजेचे आहे.

पुढील योजना पण पहा बांधकाम कामगार योजना 2022 असा करा अर्ज

मधमाशी पालन योजना अंतर्गत शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा.

पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देवून आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय केल्यास बेरोजगार तरुणांना तर या मधमाशी पालन योजनेचा लाभ मिळेलच परंतु शेतकरी बंधवाची शेती देखील नफ्यामध्ये येईल.

जाणून घेवूयात मधुमक्षिका पालन योजना जालना जिल्हा संदर्भातील माहिती. जालना जिल्ह्यामध्ये बरेच शेतकरी बांधव शेती पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन किंवा दुग्धव्यवसाय करत असतात.

बऱ्याच शेतकरी बांधवाना मधमाशी पालन संदर्भात सविस्तर माहिती नसण्याची शक्यता असल्याने अजून पाहिजे असा प्रतिसाद जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या योजनेस मिळालेला नाही.

मधमाशी पालन योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार

मधमाशांच्या मधपेट्या ह्या शेती पिके व फळ बागायतीच्या ठिकाणी व तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशाद्वारे परागीकरण होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ होते.

पिकानुसार पिकांच्या प्रकारानुसार 5 ते 45% वाढ होण्याची शक्यता आहे. हि वाढ मधमाशांनी उत्पादित केलेल्या मधाच्या व मेणाच्या किमतीच्या 10 ते 15 टक्के अधिक असते.  

त्या दृष्टीने मधकेंद्र योजना अर्थात उद्योग हा सदर उद्दिष्टांशी सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्व जिल्ह्यात मद केंद्र योजना अर्थात मधमाशा पालन राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मधमाशी पालन ही योजना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येत असून यासाठी महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे मध संचालनालय कार्यरत करण्यात आलेले आहे.

मधमाशी पालन योजनेचा तपशील

या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जालना जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

जालना जिल्हा मधमाशी पालन योजनेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • योजनेतील प्रमुख घटक वैयक्तिक मधपाळ.
  • अर्जदार साक्षर असावा.
  • स्वतःची शेती असल्यास प्राधान्य.
  • वय 18 पेक्षा जास्त असले पाहिजे.

वरील पात्रता पूर्ण करणाऱ्या जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवानी अधिक माहितीसाठी जालना जिल्हा ग्रामोद्योग विभागास संपर्क साधावा.

जालना तसेच महाराष्ट्रातील शेतकरी बांधवानी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. जालना जिल्हा योजना म्हटले कि अनेक शेतकरी बांधवाना त्या योजनेविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे शेतीला पूरक ठरणारी अशा या मधमाशी पालन योजनेचा लाभ घ्यावा व आपला अर्ज विहित वेळेत सादर करावा.

योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील बातमी बघा.

बातमी पहा.

जालना जिल्ह्यातील योजना संदर्भात अधिक माहितीसाठी या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहा.

मधमाशी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवानी ग्रामोद्योग विभागास संपर्क साधावा.

कोणत्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत?

या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

Leave a Comment