मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना mukhyamantri rojgar yojana maharashtra 2023 अंतर्गत २५ लाख कर्ज रुपयांचे कर्ज मिळणार असून त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन शासकीय स्तरावरून करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील अनेक तरुण बेरोजगार असून रोजगाराच्या शोधात आहे. अशावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेतल्यास युवकांना रोजगार मिळू शकेल.
बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेसारखीच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती हि योजना सुरु केली आहे. तुम्ही जर बेरोजगार युवक असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ घेवून रोजगार निर्मिती करू शकता.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जालना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी 2023 24 या वर्षामध्ये एकूण 890 एवढे भौतिक उद्दिष्ट मंजूर आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आतापर्यंत 643 अर्जदारांनी अर्ज केले आहेत.
ऑनलाईन प्रस्ताव केल्यानंतर छाननीअंती 500 प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रने संबंधित बँकांना पाठवले होते. मात्र बँकांनी सहा महिन्यात फक्त 49 प्रस्ताव मंजूर केले असून इतर प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत.
त्यामुळे जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची तारांबळ होत असून जिल्हा प्रशासनाकडून दर महिन्याला बैठक घेऊनही बँक व्यवस्थापन या प्रकरणी चालढकल करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जालना जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात सुशिक्षित तरुण तरुणींची संख्या वाढत आहे. महराष्ट्र राज्यात उद्योग व्यवसाय संबंधी स्वयंरोजगारच्या संधी निर्माण होत आहेत.
बेरोजगार तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी योजना
बेरोजगार युवकांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी व त्यांच्यातील सृजनशीलता व उद्योजकतेला वाव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेतला आहे.
जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची अंमलबजावणी केली जाते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील तरुण 50 लाख रुपयांपर्यंत प्रकल्प उभारू शकतात.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत 15 ते 35 टक्के पर्यंत अनुदानही मिळते त्यामुळे अनेक तरून या योजनेकडे वळतांना दिसत आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी वय व शैक्षणिक पात्रता
18 ते 45 वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते. अनुसूचित जमाती, महिला व माजी सैनिक यांना 5 वर्षासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.
10 ते 25 लाख रुपयांचे कर्ज हवे असेल तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता सातवी उत्तीर्ण तर 25 लाखाहून अधिक कर्जासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे.
शिवाय अर्जदाराकडे संबंधित उद्योग व्यवसायाचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत karj yojana maharashtra 2023 जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने 643 अर्जामधून पात्र 500 अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे. या पात्र अर्जांची कर्जासाठी बँकेकडे शिफारस करण्यात आली मात्र बँकांनी फक्त 49 अर्ज मंजूर केले आहेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे उर्वरित अर्ज प्रलंबित आहेत.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
तुम्ही जर जालना जिल्ह्यातील असाल किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास खालील बटनावर क्लिक करा.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा जालना जिल्ह्याचा कर्जाचा तपशील
बेरोजगार तरुणांच्या पात्र प्रकल्पासाठी विविध्ज बँकांनी 2 कोटी 79 हजार कर्ज मंजूर केले आहे. यामध्ये 73 लाख रुपये अनुदान आहे.
मॉड्युलर फर्निचर निर्मितीसाठी मंठा तालुक्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रकडून 27 लाख तर प्रिंटिंग युनिटसाठी बदनापूर तालुक्यामध्ये 17 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित कर्ज दहा लाखांच्या आसपास आहेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी बँकांनी सहकार्य केल्यास जालना जिल्ह्यामध्ये उद्दिष्टपुरती होऊन अनेकांच्या हाताला कुशल काम मिळू शकते.
जालना जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मिळावा यासाठी बँकर्स व लाभार्थी मध्ये दर संवाद घडविला जाणार आहे.
कर्ज मंजुरीचे वार्षिक उद्दिष्ट महिन्यात विभागण्यात आले आहे. दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाणार आहे. प्राप्त अर्ज जिल्हास्तरीय समितीकडून बँकांना पाठवले जाणार आहेत.
एक महिन्यानंतर बँका व लाभार्थी यांच्यात संवाद घडवून आणून अधिकाधिक प्रस्ताव मंजूरसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
बांधकाम कामगार योजना 2022 असा करा अर्ज
जास्तीत जास्त तरुणांनी मुख्यमंत्री योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन
जालना जिल्ह्यातील तरुणांनी या योजनेचा loan scheme for youth लाभ घेवून आपला उद्योग व्यवसाय उभारावा जेणे करून बेरोजगारीवर मात करता येईल.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अडचण येत असेल तर जिल्हा उद्योग केंद्र किंवा जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाशी संपर्क साधावा.
ऑनलाईन अर्ज कसा कारवाफ लागतो या संदर्भातील अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
ग्रामीण भागामध्ये बरेच बेरोजगार तरुणांकडे व्यवसायाच्या कल्पना आहेत परंतु आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने अशा कल्पना सत्यतात उतरू शकत नाहीत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकता आणि स्वतः उद्योग व्यवसाय उभारू शकता.