स्वाधार योजना अंतर्गत 31 डिसेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन swadhar yojana jalna

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना swadhar yojana अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांना या वसतीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येतो.

जालना जिल्ह्यामधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज लवकरात लवकर सादर करण्याचे आवाहन जालना जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जे विद्यार्थी इयत्ता अकरावी बारावी मध्ये आहेत किंवा बारावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता मिळणार आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र असलेल्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आवश्‍यक त्या कागदपत्रासह थेट जालना येथील समाज कल्याण कार्यालयात 31 डिसेंबर 2023 पूर्वी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोदाम बांधकाम योजना सुरु 12.50 लाख अनुदान

कशी आहे स्वाधार योजना

जालना समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या किंवा तुमच्या जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाला भेट द्या.

जाणून घेवूयात काय आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. या योजनेचे स्वरूप कसे आहे. निवास भत्ता, भोजन भत्ता, निर्वाह भत्ता यापोटी किती अनुदान दिले जाते या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजना अंतर्गत शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळवून दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांना विविध भत्ते दिले जातात ते खालील प्रमाणे आहे.

स्वाधार योजना अनुदान किती मिळते

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत तीन प्रकारामध्ये अनुदान मिळते ते प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

अर्जदार जर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे पिंपरी चिंचवड नागपूर इत्यादी ठिकाणी उच्च शिक्षण घेत असेल तर अशा विद्यार्थ्यांना भोजन भत्ता म्हणून 32 हजार रुपये मिळतात.

याच विद्यार्थ्यांना निवास भत्ता म्हणून 20 हजार रुपये तर निर्वाह भत्ता पोटी 8 हजार रुपये मिळतात याप्रमाणे एकूण 60 हजार रुपये अनुदान मिळते.

विद्यार्थी जर क वर्ग महानगर पालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेत असेल तर त्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता अनुक्रमे 28000, 15000, 8000 एवढा दिला जातो म्हणजेच एकूण 51 हजार रुपये भत्ता अशा विद्यार्थ्यांना दिले जाते.

उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता अनुक्रमे 25000, 12000, 6000 एकूण 43 हजार रुपये एवढे भत्ते विद्यार्थ्यांना मिळतात.

या व्यतिरिक्त विद्यार्थी जर अभियांत्रिकी शाखेतील असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5 हजार रुपये व इतर शाखेतील विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी 2 हजार रुपये एवढी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात दिली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार swadhar yojana योजना अंतर्गत विविध्ज लाभ मिळतो त्यामुळे तुम्ही जर जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी असाल तर समाजकल्याण विभागामध्ये तुमचा अर्ज विहिती तारखेच्या आत जमा करून द्या.

Leave a Comment