शेतकरी अभ्यास दौरा अर्ज नमुना PDF download 2023

शेतकरी अभ्यास दौरा अर्ज संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या. पहा कोठे आणि कसा करावा लागतो अर्ज.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौरा काढण्यात येणार असून ०५ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बऱ्याच वेळेस इतर शेतकरी कशा पद्धतीने शेती करतात याची माहिती आपल्याला नसते कदाचित इतर शेतकरी हे आपल्यापेक्षा अगदी नाविन्यपूर्ण शेती करत असतात त्यामुळे आपल्याला पण त्यांपासून चांगली शेती करण्यास प्रेरणा मिळते.

Table of Contents

  शेतीमध्ये नाविन्य यावे यासाठी महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीने राज्याबाहेर शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला जातो. या शेती अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवाना कृषी विभाग कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे.

  दिनांक ३१ डिसेंबर हि अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.

  तुम्हाला देखील या शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी व्हायचे असेल आणि आपल्या शेतीमध्ये बदल करायचा असेल तर लगेच अर्ज करून द्या.

  Mukhyamantri rojgar nirmiti karykram जालना जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु

  शेतकरी अभ्यास दौरा अर्ज pdf अर्ज डाउनलोड करा

  शेतीमध्ये अमुलाग्र बदल करण्याची तुमची इच्चा असेल तर या शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये तुम्ही सामील होऊ शकता.

  यासाठी तुम्हाला जो अर्ज सादर करावा लागणार आहे तो अर्ज जर तुमच्याकडे नसेल तर खालील बटनावर क्लिक करून हा अर्ज डाउनलोड करून घ्या.

  शेतकरी अभ्यास दौरा अर्ज

  वरील अर्ज डाउनलोड करून घ्या. अर्जाची प्रिंट काढून घ्या. त्यामध्ये योग्य ती माहिती भरा आणि आपल्या तालुक्यातील कृषी विभागास हा अर्ज सादर करून द्या.

  फलोत्पादन शेती मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे काम केले तर तुम्हाला कृषी विभागाच्या वतीने राज्याच्या बाहेर शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी शासकीय खर्चातून पाठविले जाते. त्यासाठी तुम्हाला शेतकरी अभ्यास दौरा अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

  अभ्यास दौरा महत्वाचा

  शेतीमध्ये असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असो बदल हि काळाची गरज आहे त्यामुळे शेतीमध्ये इतर राज्यांमध्ये काय पिकविले जाते याचा अभ्यास करणे देखील गरजेचे आहे.

  तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये फळबाग किंवा इतर पिके घेत असाल तर तुम्ही या राज्याबाहेरील अभ्यास दौरा संदर्भात अर्ज करू शकता.

  शेतकरी अभ्यास दौरा ऑनलाईन अर्ज shetkari abhyas daura online application सध्या उपलब्ध नसून शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीनेच कृषी कार्यालयात हा अर्ज सादर करावा लगणार आहे.

  राज्याबाहेरील अभ्यास दौर्यामुळे शेतकऱ्यांना खूप नवीन बाबी शिकावयास मिळणार आहे यात शंका नाही. हा शेतकरी अभ्यास दौरा खूपच महत्वाचा असून शेतकरी बांधवानी अभ्यास दौऱ्यामध्ये संबधित शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे जेणे करून त्यांना देखील आपल्या शेतीमध्ये बदल करता येवू शकेल.

  शेतीमध्ये बदल आवश्यक

  पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देवून आता आधुनिक पद्धतीने शेतकरी बांधवानी शेती करणे हाच या शेतकरी अभ्यास दौऱ्याचा खरा हेतू असणार आहे. वाढती बेरोजगारी लक्षात घेता तरुण आता हळूहळू शेतीकडे करिअर म्हणून बघत आहेत आणि हि नक्कीच चांगली बाब आहे.

  पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास शेतमालास पाहिजे तसा भाव मिळत नाही परिणामी शेतीविषयी नकारात्मक भावना तयार होते. हे चित्र जर बदलायचे असेल तर शेतीमध्ये बदल होणे गरजेचे आहे.

  यासाठी एखादा शेतकरी जर शेतीमध्ये नवीन बदल करत असेल तर त्या बदलाबद्दल आपल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अभ्यास करायला हवा.

  याचमुळे राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. हे अभ्यास दौरे प्रत्येक तालुक्यामध्ये आयोजित केले जातात. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर वर दिलेला शेतकरी अभ्यास दौरा अर्ज तुमच्या कृषी विभाग कार्यालयात सादर करून द्या.

  फलोत्पादन शेती फायद्याची

  जे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये फळबाग लावतात त्यांच्यासाठी हा राज्याबाहेरील अभ्यास दौरा आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळबागेकडे वळणे गरजेचे आहे. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कि जालना जिल्ह्यातील किती किंवा कोणत्या तालुक्यांमध्ये फळबाग लागवड केली जाते, तर नक्कीच अगदी काहीच तालुक्यांमध्ये हि फळबाग लागवड केली जाते.

  फळबाग लागवडीच प्रोत्साहन मिळावे यासाठी जालना कृषी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून फलोत्पादन शेतीमध्ये प्रगती करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर शेतकरी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

  पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देवून तुम्ही जर फळबाग शेती केली तर नक्कीच तुमची शेती फायद्यात येवू शकते. सीताफळ फळबाग अत्यंत कमी पाण्यामध्ये येते आणि या फळबागेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढल्याचे अनेक उदारणे आहेत. शेतकऱ्यांनी ती पहिली पाहिजे.

  खडकाळ जमिनीवर कमी पाण्यामध्ये भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्याने कशी पेरू लागवड केली त्या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा जेणे करून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल.

  सरांश

  राज्याबारील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी ०५ जानेवारी २०२३ पर्यंत शेतकरी बांधवांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फळबाग आहे किंवा त्यांना फळबाग लागवडीचा अनुभव आहे अशा शेतकरी बांधवांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली जाणार आहे.

  शेतकरी अभ्यास दौरा अर्ज pdf मध्ये उपलब्ध असून तो वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. हा शेतकरी अभ्यास दौरा अर्ज प्रिंट काढून संबधित कृषी विभागास विहित दिनाकांच्या आत सादर करून द्या.

  शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज डाउनलोड कसा करावा?

  शेतकरी अभ्यास दौरा अर्ज नमुना PDF download

  राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी लागणारा pdf अर्ज डाउनलोड करा. सदरील अर्ज pdf मध्ये असल्याने चांगल्या प्रतीची प्रिंट निघेल ती काढून घ्या आणि तुमच्या तालुक्यातील कृषी विभागास सादर करून द्या.

  शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज कोठे आणि कधी करावा लागतो?

  शेतकरी अभ्यास दौरा अर्ज

  तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कृषी कार्यालयात हा अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या तारखे अगोदर ज्या शेतकऱ्यांना राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी व्हायचे आहेत त्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  कोणते शेतकरी असतात अभ्यास दौऱ्यासाठी पात्र

  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत हा शेतकरी अभ्यास दौरा असणार आहे. ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड अनुभव आहे किंवा ज्यांच्या शेतामध्ये फळबाग लागवड केलेली आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

  Leave a Comment