जालना जिल्हा हवामान अंदाज सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता jalna havaman andaj

जाणून घेवूयात जालना जिल्हा हवामान अंदाज jalna havaman andaj संदर्भातील सविस्तर माहिती.

जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची शेती कामे जवळपास आटोपली आहेत. आता फक्त पाऊस कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस पडणार आहे. ७ ते  १० जून २०२४ या कालावधीमध्ये प्रादेशिक हवामानशास्त्र कुलाबा यांच्या सूचनेनुसार जोरात वारा वाहणार असल्याने शेतकरी बांधवानी या संदर्भात काळजी घ्यावी.

हवामान विभागाने जालना जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केला असून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

झेरॉक्स मशीन अनुदान पिठाची गिरणीसाठी अनुदान 31 मार्चपर्यंत होणार जमा

७ ते १० जून जालना जिल्हा हवामान अंदाज

आगामी ७ ते १० जून पर्यंत महाराष्ट्रात सुसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असणार असून वाऱ्याचा वेग ताशी ५०-६० कि.मी.प्र.ता. असा राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकरी बांधवानी स्वतः सह आपल्या गुराढोरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

७ जून रोजी जालना जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणारा असून मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

दिनांक ८ जून रोजी जालना जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. जालना जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ठिकाणी विजेच्याकडकडाटासह सोसाट्याचा वारा ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आह.

दिनांक 9 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून दिनांक 10 जून रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा

जालना जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहणार हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जालना जिल्हा हवामान अंदाज अशा प्रकारे ७ ते १० जून पर्यंत हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असून त्यानुसार शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेघगर्जनेचेवेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा तसेच विजा चमकत असतांना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

विजांचा कडकडाट सुरु असतांना काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जालना ०२४८२ २२३१३२ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. जालना जिल्हा हवामान अंदाज.

बातमी पहा

Leave a Comment