कर्जासाठी अर्ज सुरु पहा सविस्तर माहिती.
सध्या सुशिक्षित तरुण दिवसेंदिवस बेरोजगार होत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना शासनाने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे.
शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चर्मकार, ढोर, होलार इत्यादी समाज वर्गातील तरुणांना शासकीय योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज करण्याची आव्हान केले आहे.
तरी या प्रवर्गातील तरुणांना या संधीचा लाभ घेता येईल.
जाणून घेऊया या योजनेबद्दल. मित्रांनो या योजनेचा फायदा सुशिक्षित तरुणांना भेटणार आहे त्यामुळे बेरोजगाराचे प्रमाण कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
घरकुल बांधकाम न करणाऱ्यांना पैसे करावे लागणार परत
योजनेचा उद्देश
1) अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल.
2) ही योजना राबवल्यानंतर व्यक्तीचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक दर्जा उंचावेल. हा विकास घडवून आणण्यासाठी महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येतात येणार आहे.
योजना कोणासाठी आहे?
संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ मार्फत योजनेचा लाभ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींकरिता आहे.
अटी
१)अर्जदार अनुसूचित जातीतील चर्मकार असावा.
2) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3) अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे पर्यंत असावे.
4) अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाची त्याला ज्ञान व अनुभव असावा.
5) अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रुपये 98000 असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ मिळू शकेल व शहरी भागातील चर्मकार समाजातील कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रुपये 120000 पर्यंत असणे आवश्यक आहे.
6) महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
कर्जासाठी अर्ज सुरु कोणती कागदपत्रे असावी?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सदर व्यक्तीकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1) संबंधित व्यक्तीकडे सक्षम अधिकाऱ्यांनी जातीचा दाखला असावा.
2) सदर व्यक्तीकडे तहसीलदार यांच्याकडून घेतलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
3) पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक.
4) शैक्षणिक दाखला.
5) पॅन कार्डची झेरॉक्स प्रत असणे आवश्यक.
6) व्यवसायाचे दरपत्रक व्यक्तीला ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्या जागेची भाडेबाबत असावी.
7) करार पत्र किंवा मालकी हक्क संदर्भातील पुरावासह नमुना ८ असणे आवश्यक.
8) प्रोजेक्ट रिपोर्ट.
9) लायसन्स बॅच.
10) व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र.
11) व्यवसायाशी संबंधित व्यक्तीजवळ तांत्रिक प्रमाणपत्र असणे गरजेचे.
12) सदर व्यक्तीकडे अनुभवाचा दाखला असावा.
13) प्रतिज्ञा प्रमाणपत्र.
वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.
बांधकाम कामगार योजना 2023 असा करा अर्ज
अर्ज करण्याचा कालावधी
या योजनेसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने अर्ज करण्याची मुदत 31 जुलै हि दिली आहे. त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर शेवट दिनांकाच्या आत तुमचा अर्ज सादर करून द्या.