उघड्यावर थुंकाल तर दंड जालना नगर पालिकेचा ठराव.
उघड्यावर थुंकणे तसेच लघुशंका करणे शौच करणे इत्यादीसह कचरा करणाऱ्यावर आता जालना महापालिकेकडून दंड ठोठावला जाणार आहे.
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा लघु शंका केल्यामुळे दुर्गंधी निर्माण होते यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
या दुर्घंधीला आळा घालण्यासाठी आता जालना महापालिकेने कंबर कसली आहे आणि यासाठी ५० रुपयांपासून ५०० रुयांपर्यंत तरतूद करण्यात आली आहे.
मुद्रा लोन योजना 2022 असा करा अर्ज
उघड्यावर थुंकाल तर दंड दुर्गंधीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम
आपले शहर किंवा घर परिसर स्वच्छ ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वाचे असते. सध्या जालना शहरामध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या घाणीला नियंत्रणात आणण्यासाठी जालना नगर पालिकेने ठराव घेतला आहे.
यापुढे जो व्यक्ती सार्वजनिक ठकाणी थुंकणे, कचरा टाकणे, शौच करणे किंवा लघु शंका करतांना दिसला तर सदरील इसमाला आता ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.
जालना शहर सध्या झपाट्याने प्रगती करत आहे आपसूकच शहर निरोगी आणि सुंदर ठेवायचे असेल तर त्यासाठी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
जालना जिल्ह्यात बोगस पिकविमा प्रकरणे.
काटेकोर अंमलबजावणी गरजेची
कोणताही निर्णय घेतल्यावर त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. सगळ्यात महत्वाचे आहे. स्वच्छता संदर्भात या पूर्वी देखील अनेक निर्णय घेण्यात आले आहेत परंतु त्यांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्याने ते निर्णय अपयशी ठरले आहेत.
जालना शहरातील अनेक शासकीय कार्यालयातील भिंतीवर अनेकजण बिनधास्त थुंकताना दिसतात. या संदर्भात कठोर कारवाही झाली तरच यामध्ये सुधारणा होऊ शकते.
जालना शहर सुंदर ठेवायचे असेल तर स्वच्छतेची सवय नगरीकांना अंगी बाळगणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
जालना सोने का पालना
जालना शहरामध्ये मोठमोठाले उद्योग व्यवसाय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणत रोजगार निर्माण झाला आहे त्यामुळेच जालना शहराला जालना सोने का पालना असे म्हणतात.
जालना जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे असल्याने अनेक पर्यटक देखील जालना शहरामध्ये निवास करतात अशावेळी शहर सुंदर असेल तर अधिक पर्यटक या शहराकडे आकर्षक होतील.
जालना शहरामध्ये उद्योग व्यवसाय झपाट्याने वाढत असल्याने अनेकांचा वावर या शहरामध्ये असतो परंतु ठराविक परिसर वगळला तर जालना शहरामध्ये पूर्वीपासूनच स्वच्छता समस्या भेडसावत आहे.
आता नगर पालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला असल्याने परिसर स्वच्छ होण्यास मदत मिळणार आहे.
उघड्यावर थुंकाल तर दंड मिळणार असल्याने आता शहरातील अस्वच्छतेला नक्कीच आळा बसेल यात शंका नाही.