जाणून घेवूयात जालना जिल्हा बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र संदर्भातील सविस्तर माहिती.
बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजना, शिष्यवृत्ती, आरोग्य योजना, आर्थिक मदत व इतर लाभ दिले जातात. पूर्वी या योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र पडताळणी करण्यासाठी जिल्हा कार्यालयात जावे लागत असे, यामुळे कामगारांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचा खर्च वाढत असे.
मात्र आता शासनाने मोठा निर्णय घेत सर्व तालुक्यात ‘कामगार सुविधा केंद्रे’ (bandhkam kamgar taluka Suvidha kendra Jalna ) उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे प्रत्येक कामगाराला आपल्या तालुक्यातच कागदपत्र पडताळणी, नोंदणी किंवा इतर शंकांचे निराकरण करता येते.
बहुतांश कामगारांना आपल्या तालुक्यातील कामगार सुविधा केंद्र कुठे आहे हे माहिती नसते. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व 7 तालुक्यांमधील सुविधा केंद्रांचे संपूर्ण पत्ते येथे देत आहोत.
जालना बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र पत्ते (Taluka-wise List)
1) बदनापूर – Badnapur kamgar suvidha kendra
📌 पत्ता:
बालकृष्ण कॉम्प्लेक्स, नियर रेल्वे स्टेशन रोड, बदनापूर, जालना
2) घनसावंगी – Ghansawangi kamgar suvidha kendra
📌 पत्ता:
घर नं. 1668, पाथरी रोड,
सावंगी प्लॉट नं. 6, वाडेकर निवास,
श्रीराम नगर, इन्कम टॅक्स ऑफिस जवळ,
घनसावंगी, जालना
3) जाफराबाद – Jafrabad kamgar suvidha kendra
📌 पत्ता:
भोकरदन रोड,
आंबेडकर चौक, अपोजिट पूर्ण रोड,
जाफराबाद, जालना
4) भोकरदन – Bhokardan kamgar suvidha kendra
📌 पत्ता:
छत्रपती शिवाजी महाराज चौक,
नियर सुभाष कृषी सेवा केंद्र,
जाफराबाद रोड,
भोकरदन, जालना
5) अंबड – Ambad kamgar suvidha kendra
📌 पत्ता:
सावजी बिल्डिंग, कोर्ट रोड,
नियर एसबीआय बँक,
अंबड, जालना
6) मंठा – Mantha kamgar suvidha kendra
📌 पत्ता:
न्यू कमांडो अकॅडमी बिल्डिंग,
आई कॉम्प्लेक्स, देवी रोड,
मंठा, जालना
7) परतुर – Partur kamgar suvidha kendra
📌 पत्ता:
काळे कॉम्प्लेक्स, मेन रोड,
पोलीस स्टेशनजवळ,
परतुर, जालना
8) जालना शहर – Jalna City kamgar suvidha kendra
📌 पत्ता:
शॉप नं. 16/465,
जीवन कृष्णा आरकडे,
नियर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिस,
जालना
जालना जिल्ह्यातील नागरिकांनी बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावा.
जालना जिल्ह्यामध्ये अनेक बांधकाम कामगार असून या बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. आता तुम्ही बाहेरून म्हणजेच सीएससी सेंटर किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रामधून बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकता.
हा अर्ज केल्यानंतर ज्या दिवशी कामगारांना कामगार सुविधा केंद्रामध्ये बोलावले जाईल त्या दिवशी वरती दिलेल्या ज्याही तालुक्यातील तुम्ही असाल त्या कामगार सुविधा केंद्रामध्ये मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहा.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात.
या योजनांचा आवश्य लाभ घ्या.
जालना जिल्ह्यामध्ये किती बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्रे आहेत?
संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये एकूण ८ बांधकाम कामगार सुविधा केंद्रे आहेत (जालना शहर समाविष्ट करून)
बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्राचा काय फायदा आहे?
कामगारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी या बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्रामध्ये उपस्थित राहावे लागते.
कोणत्या व्यक्ती याचा लाभ घेवू शकतात?
ज्या व्यक्तींची बांधकाम कामगार नोंदणी झालेली आहे असे नोंदणीकृत बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेवू शकतात.