जालना जिल्ह्यात बोगस पिकविमा प्रकरणे.

शेतातील पिकांचे नुकसान झाले तर पिकविमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतातील पिकांचा किंवा फळबागेचा पिकविमा काढत असतात. परंतु सध्या बोगस पिकविमा काढण्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत.

जालना जिल्ह्यामध्ये 7307 बोगस फळपिकविमा प्रकरणे समोर आले आहेत. जालना जिल्ह्यामध्ये मृग बहार फळपीक विमा योजनेच्या नावाखाली अनेकांनी बोगस फळपीक विमा काढल्याचे समोर आले आहे.

पीकविमा लाभ मिळविण्यासाठी कोणतेही फलबाग न लावता पीक विमा काढला असल्याचे अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत.

ऑनलाइन अर्ज करतांना घ्यावी काळजी

याच बाबीचे महत्व लक्षात घेवून आता कृषी विभागाने फळपीक विमा योजनेसाठी केलेल्या अर्जाची छाननी सुरू केली आहे.

ज्या शेतकर्‍यांनी बोगस फळपीक विमा सादर केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.

ज्या व्यक्ति पीक विमा ऑनलाईन अर्ज सादर करतात त्यावेळी अर्ज एसडीआर करताना सर्व कागदपत्रे पाहून पीक विमा अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जालना जिल्ह्यात बोगस पिकविमा

Leave a Comment