शिलाई मशीन योजना 2025 ऑनलाईन अर्ज सुरु
जालना जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशीन योजना 2024-25 संदर्भात अर्जाचा नमुना, ऑनलाईन प्रक्रिया, पात्रता आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात.
जालना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या (SC) महिलांसाठी शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन प्रक्रिया सुरु झालेली आहे.
शिलाई मशीन योजना उद्देश : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या जिल्हा परिषद योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिली जाते. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना शिवणकाम व्यवसाय करण्यास मदत मिळू शकेल.
अर्जदाराला ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करता येईल. या ब्लॉग पोस्टमध्ये, अर्जाचा नमुना, ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांबद्दल सविस्तर देण्यात आलेली आहे.
Table of Contents
शिलाई मशीन योजनेचा उद्देश काय आहे
- ग्रामीण भागातील अनुसूचित प्रवर्गातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- शिवणकाम व्यवसाय सुरु करण्यासठी त्यांना साहित्य जसे कि शिलाई मशीन देणे.
- सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधणे.
- स्थानिक पातळीवर महिलांच्या आर्थिक प्रगतीद्वारे वैयक्तिक आणि पर्यायाने समुदायाचा विकास साधणे.
शिलाई मशीनचे फायदे
- जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून पात्र महिलांना ९० टक्के अनुदानावर हि शिलाई मशीन दिली जाणार आहे.
- केवळ १० टक्के लाभार्थी हिस्सा भरून हि शिलाई मशीन योजना मिळणार असल्याने याद्वारे शिवणकाम, कपडे दुरुस्ती किंवा डिझायनिंगद्वारे चांगल्या प्रकारचे उत्पन्न महिलांना मिळवण्याची संधी निर्माण होणार आहे.
- या शिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे टेलरिंग प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर अशा महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी अगोदर प्राधान्य दिले जाते.
- शिवणकाम सुरु झाल्याने कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची पात्रता खालील प्रमाणे असणार आहेश
शिलाई मशीन योजना पात्रता तपासून घ्या आणि मगच अर्ज भरण्यास सुरुवात करा.
- अर्जदार हा जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
- अनुसूचित जाती (SC) उपयोजना (विघयो) प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांदरम्यान असावे.
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
- शिवणकामाचे मूलभूत ज्ञान असल्यास प्राधान्य मिळेल. प्रशिक्षण नसल्यास तरी देखील महिला अर्ज सादर करू शकते.
- अर्जदाराने यापूर्वी समान स्वरूपाच्या सरकारी योजनेतून शिलाई मशीनचा लाभ घेतलेला नसावा.
पुढील योजना पण पहा : बांधकाम कामगार योजना
योजनेसाठी अपात्रता
- अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाबाहेरील अर्जदार यांनी अर्ज करू नयेत.
- अर्जदार जर जालना जिल्ह्याबाहेरील रहिवासी असेल तर त्यांना देखील या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार अन्ही.
- यापूर्वी महिला व बाल कल्याण विभागाकडून शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
- वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजारांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबातील महिला अपात्र ठरतील.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा जसे कि आधार कार्ड.
- अर्जदार अनुसूचित जाती (SC) असल्याचा पुरावा जसे कि जातीचे प्रमाणपत्र.
- लाभार्थी जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा दाखला जसे कि रहिवासी प्रमाणपत्र.
- १ लाख २० हजारापेक्षा कमी असलेले कौटुंबिक वार्षिक उत्पन्न.
- अर्जदाराच्या नावे असलेल्या बँक खात्याचा तपशील पासबुक पासबुकची झेरॉक्स प्रत
- अर्जदाराचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो.
- शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र.
- दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र (पर्यायी): BPL कुटुंबातील असल्यास हे प्रमाणपत्र फायदेशीर ठरू शकते.
पुढील योजनेचा पण लाभ घ्या : घरकुल योजना
ऑफलाइन अर्ज मूळ कागदपत्रांसह संबधित कार्यालयात सादर करावा
शिलाई मशीन योजना २०२५ अर्साज सादर करतांना सादर केलेली सर्व कागदपत्रे अचूक आणि पूर्ण असणे गरजेचे आहे नाहीतर अर्ज नाकारला नाकारला जाण्याची शक्यता असू शकते.
शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
- जालना जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर जा https://zpjalna.maharashtra.gov.in/.
- किंवा गुगलमध्ये “शिलाई मशीन Jalna ZP Yojana” सर्च वेबसाईट शोधा.
- वेबसाइटच्या मेनूबारवरील योजना कार्यक्रम सेक्शनमध्ये जा.
- राज्य सरकार या पर्यायावर क्लिक करा.
- तपशील या बटनावर क्लिक करा.
- या ठिकाणी ऑनलाईन अर्ज त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्जामध्ये माहिती भरण्यास सुरुवात करा. हा एक गुगल फॉर्म असेल.
- ऑनलाईन फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, उत्पन्न, जात आणि इतर तपशील या संदर्भातील माहिती विचारलेली आहे त्यामुळे हि माहिती व्यवस्थित सादर करा.
- सर्वात शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या.
शिलाई मशीन योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- जिल्हा परिषद जालना यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील शिलाई मशीन योजनेचा अर्जाचा नमुना pdf मध्ये डाउनलोड करा.
- PDF अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, उत्पन्न, जात आणि इतर तपशील काळजीपूर्वक भरा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडा.
- यामध्ये देखील विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित पेनाने लिहून अर्ज पूर्ण करा. अर्ज पूर्ण झाल्यावर तालुक्याच्या CDPO कार्यालयात जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर पावती घ्या.
30 जुलै 2025 ही ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख आहे. वेळेत अर्ज न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
शिलाई मशीन योजनेच्या अर्जामध्ये समाविष्ट करावयाची माहिती
- अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क संदर्भातील तपशील.
- आधार कार्ड क्रमांक.
- कौटुंबिक उत्पन्न आणि बँक खाते तपशील.
- शिवणकाम प्रशिक्षणाचा तपशील (जर लागू असेल).
शिलाई मशीन २०२५ साठी ऑनलाईन अर्ज करतांना घ्यावयाची काळजी
शिलाई मशीन योजना २०२५ अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करतांना काही चुका होऊ शकतात. या चुका टाळा.
- अर्जामध्ये चुकीची माहिती देणे टाळा
- शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहत बसू नका वेळेत अर्ज सदर करा.
- ऑनलाइन अर्ज करताना इंटरनेट कनेक्शन किंवा वेबसाइटच्या समस्यांमुळे अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
- अर्ज सादर करण्याआधी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का ते तपासून घ्या किंबहुना अपात्र असाल तर अर्ज करूच नका.
अर्ज सादर करतांना चुका टाळण्यासाठी काही टिप्स
- सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवा.
- पात्रता निकष काळजीपूर्वक तपासा.
- ऑनलाईन अर्जासाठी चांगले इंटरनेट कनेक्शन आणि डिव्हाइस वापरा.
- शेवटच्या तारखेच्या किमान एक आठवडा आधी अर्ज जमा करा.
- आपले सरकार सेवा केंद्रातून मार्गदर्शन घ्या.
योजनेचा सारांश
जालना जिल्हा परिषदेची शिलाई मशीन योजना 2024-25 ही ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सक्षमीकरणाची संधी उपलब्ध करून देते.
1 जुलै 2025 ते 30 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
अर्जाचा नमुना डाउनलोड करून किंवा ऑनलाईन फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण करा.
सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि वेळेत अर्ज करा.
शिलाई मशीन योजना २०२५ च्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकता.
शिलाई मशीनसाठी अनुदान किती मिळते?
शिलाई मशीन योजनेसाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळते तर १० टक्के हिस्सा लाभार्थीला स्वतः भरावा लागतो.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्ज पद्धत आणि ऑफलाईन पद्धत दोन्ही संदर्भात या लेखामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शिलाई मशीनसाठी कोणत्या व्यक्ती अर्ज करू शकतात?
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात.
ऑफलाईन अर्ज कोठे सादर करावा?
शिलाई मशीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठीअ ऑफलाईन अर्ज तालुक्यातील सीडीपोओ कार्यालयात सादर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आह?
शिलाई मशीन योजना २०२५ साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२५ हि आहे.