मिनी ट्रॅक्टर योजना 3.50 लाख मिळणार.

जाणून घेवूयात मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील महत्वपूर्ण माहिती. जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकरी योजना असतात. या योजनांची माहिती आपल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्हाव्ही म्हणून आज आपण एका नवीन योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणत वाढलेला आहे. नागरणी असो कि पेरणी सर्व कामे आता ट्रॅक्टरद्वारे केली जाते.

शेतीमध्ये जास्तीत जास्त कामे कामे ट्रॅक्टरने केली जातात. असे असले तरी देखील अंतरमशागतीसाठी ट्रॅक्टरला काही मर्यादा येतात.

अशावेळी तुमच्याकडे मिनी ट्रॅक्टर असेल तर शेती मशागतीची कामे लवकर होऊ शकतात.

मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा मिनी ट्रॅक्टरची साईज छोटी असते. साईज कमी असल्यामुळे पावसाळ्यात देखील अंतर पिकांमध्ये या मिनी ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे सोपे होते.

ट्रॅक्टरने कामे सोपी जरी होत असली तरी असे मिनी ट्रॅक्टर खरेदी करणे बऱ्याच जणांच्या आवाक्याबाहेर असते. अशावेळी शासकीय अनुदानाचा लाभ घेवून देखील तुम्ही हे मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता.

ज्यांच्याकडे शेती आहे असेच लाभार्थी मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेवू शकतात असा तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. शेती व्यतिरिक्त इतर नागरिक देखील ह्या मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात माहिती मिळवून या योजनेचा लाभ घेवू शकतात आणि ट्रॅक्टरद्वारे इतर शेतकऱ्यांची मशागतीची कामे करून व्यवसाय करू शकतात.

पुढील योजना पण पहा. बांधकाम कामगार योजना 2022 असा करा अर्ज

समाज कल्याण विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर योजना

समाज कल्याण योजना अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर खरेदी करून नव बौद्ध किंवा अनुसूचित जाती परवार्गातील नागरिक त्यांचे आर्थिक राहणीमन उंचावू शकतात.

जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात या योजनांची माहिती आपण जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना या वेबसाईटच्या माध्यमांतून कळवीत आहोत जेणे करून त्यांना या योजनांची माहिती मिळेल.

मिनी ट्रक्टर योजना अंतर्गत कशा पद्धतीने तुम्हाला शासकीय अनुदान मिळते, किती मिळते, अर्ज कोठे करावा लागतो या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेवूयात या ठिकाणी दिलेली आहेज ती व्यवस्थित वाचून घ्या.

केवळ माहितीच नव्हे तर मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील माहितीचा व्हिडीओ देखील या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे. तो देखील बघा जेणे करून तुम्हाला हि योजना अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल.

Table of Contents

    मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

    समाज कल्याण जालना मिनी ट्रॅक्टर योजना साठी मिळते ९० टक्के अनुदान

    शेतीमध्ये विविध कामाठी ट्रॅक्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणत केला जातो. विशेषता मिनी ट्रॅक्टरची मागणी सध्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर योजना नक्कीच फायद्याची ठरणार आहे.

    ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये मोठ्या प्रमाणत होत असला तरी पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यास मर्यादा येते. अशावेळी तुमच्याकडे मिनी ट्रॅक्टर असेल तर त्याचा उपयोग अगदी शेतातील पिकांमध्ये विविध कामासाठी केला जावू शकतो.

    मिनी ट्रॅक्टर शासकीय अनुदानावर देखील खरेदी करता येते. मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी शासनाकडून ९० % अनुदान मिळते.

    mini tractor yojana यासाठी अर्ज कसा करावा लागतो, कोणत्या व्यक्ती यासाठी पात्र असतात हे आपण या ठिकाणी अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

    मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता

    अनुसूचित जाती तसेच नवबौध्द प्रवर्गातील नागरिकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन तयार व्हावे व त्यांचे राहणीमान बदलावे या हेतूने mini tractor yojana हि योजना राबविली जात आहे.

    या योजनेंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टरसाठी लागणारी इतर साहित्य पुरवठा  करणे हा या योजनेचा हेतू आहे.

    या योजनेसाठी जालना जिल्ह्यातील केवळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील अर्जदार अर्ज करू शकतील.

    मिनी ट्रॅक्टर योजना अटी अशा आहेत.

    • जे स्वयंसहाय्यता बचत गट असणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिक असावेत.
    • स्वयंसहाय्यता बचत गटातील मेंबर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
    • बचत गटामध्ये 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे गरजेचे आहे.
    • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रु. 3.50 लाख इतकी आहे.
    • स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.

    जाणून घ्या अर्ज कोठे करावा लागणार.

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत आणि या साठी कोणत्या अटी दिलेल्या आहेत हे आपण जाणून घेतलेले आहे.

    आता जाऊन घेवूयात कि या योजनेसाठी ऑनलाईन आज करण्यासठी कोठे अर्ज करावा लागतो.

    योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयास तुम्हाला भेट द्यायची आहे. समाज कल्याण कार्यालयामध्ये या योजनेसाठी लागणारा अर्ज आणि इतर महत्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे.

    या कार्यालयामध्ये अर्ज करून ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अर्जदार अर्ज करू शकतात. मिनी ट्रॅक्टर योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे त्यामुळे तुम्ही जालना जिल्हा बाहेरील शेतकरी असाल तरी देखील अशाच पद्दतीने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

    मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील अधिक माहितीसाठी शासनाच्या वेबसाईटला भेट द्या.

    समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नव बौद्ध या प्रवर्गासाठी विविध योजना सुरु असतात. या योजनांची संपूर्ण माहिती तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यास मिळेल.

    शासनाच्या या वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

    या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाचे एक स्वतंत्र कार्यलय असते. या कार्यालयास भेट देवून सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या समाज कल्याण योजनांची माहिती मिळवू शकते. तर अशा पद्धतीने मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे.

    विविध वर्तमानपत्रामधील जिल्हा आवृत्तीमधेय देखील विविध जिल्हा परिषद योजना संदर्भात माहिती किंवा वृत्त प्रसिद्द केले जाते. त्यामुळे वर्तमान पत्रातून देखील तुम्हाला या योजनांची माहिती मिळविण्यास मदत होते.

    जालना जिल्हा झेड पी योजना तसेच इतर योजना संदर्भात आपण एक एक करत माहिती जाणून घेणार आहोत.

    केवळ माहितीच नव्हे तर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो त्या संदर्भातील प्रत्यक्ष उदाहरणाचे व्हिडीओ देखील आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे आपल्या या jalna zp yojana वेळोवेळी भेट देत राहा.

    मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत किती अनुदान मिळते.

    १० टक्के स्वःहिस्सा भरल्यानंतर ९० टक्के अनुदान मिळते म्हणजेच ३.५० लाखापर्यंत अनुदान मिळते.

    या योजनेचा अर्ज कसा आणि कोठे करावा

    मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. शिवाय या योजना संदर्भात एक स्वतंत्र व्हिडीओ देखील बनविलेला आहे हा व्हिडीओ बघितल्यावर अर्जदारास या योजनेची संपूर्ण कल्पना येवू शकते आणि ते या योजनेचा लाभ घेवू शकतात.

    या योजनेसाठी कोणत्या प्रवर्गातील अर्जदार अर्ज करू शकतील.

    अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील अर्जदार अर्ज करू शकतील.अर्ज करू शकतील. बचत गटांसाठी हि योजना आहे.

    अर्ज ऑनलाईन आहे कि ऑफलाईन

    या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर संबधित जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधावा.

    Leave a Comment