जालना जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागामध्ये कोणत्या कृषी सेवा केंद्रामध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे या संदर्भातील माहिती आता मोबाईलवर मिळणार आहे.
जालना जिल्हा कृषी विभागाच्या वतीने नवीन ब्लॉग लिंक तयार करण्यात आली असून यावर कोणत्या कृषी केंद्रामध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे या संदर्भात माहिती मिळेल जेणे करून त्यांना योग्य वेळी योग्य ते खत मिळू शकेल.
खतउपलब्ध साठा आता मोबाईलवर देखील तपासता येणार असल्याने शेतकऱ्यांना हे खूपच सोयीचे होणार आहे.
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना
कसा होणार शेतकऱ्यांना फायदा
बऱ्याच वेळेस खते उलब्ध असून देखील काही कृषी सेवा केंद्रे शेतकऱ्यांना खत न देण्याचे अनेक प्रकार घडलेले आहे. आता कृषी केंद्रामधील खतांच्या उपलब्धतेबाबतची माहिती ऑनलाईन दिसत असल्याने किती खत उपलब्ध आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यामुळे खतसाठा उपलब्ध दिसत असल्याने कोणताही कृषी सेवा दुकानदार खत देण्यासाठी नाही म्हणणार नाही.
जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जालना जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कापूस मका तूर उडीद हे पिके घेतली जातात.
खताच्या कृत्रिम टंचाईमुले ऐनवेळी खत उपलब्ध नसल्याने पिक हातातून जाते अशावेळी या सुविधेमुळे शेतकऱ्यांना योग्यवेळी आपल्या शेतातील पिकांना खताचा पुरवठा करता येणार आहे.
कसा तपासावा ऑनलाईन खत उपलब्ध साठा
जालना जिल्हा कृषी विभागाकडून वेगवेगळ्या गावातील कृषी सेवा केंद्रांमध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे या संदर्भात ऑनलाईन माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.
यासाठी कृषी विभाग जालना यांच्याकडून एक लिंक देण्यात आली आहे या लिंकवर क्लिक करून जालना जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे या संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हि प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
- कृषी विभाग जालना यांनी खत उपलब्धसाठा जाणून घेण्यासाठी दिलेली लिंक ओपन करा किंवा येथे क्लिक करा.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल यामध्ये जिल्हा जालना निवडा.
- जालन्यातील जो तुमचा तालुका असेल तो निवडा.
- आता तुमच्या तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची नावे त्यांचे मोबाईल नंबर आणि त्या कृषी सेवा केंद्रातील उपलब्ध खतसाठा या संदर्भातील माहिती या पोर्टलवर तुम्हाला दिसेल.
अशा पद्धतीने जालना जिल्ह्यामध्ये कोणत्या कृषी सेवा केंद्रामध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे या संदर्भात अचूक माहिती तुम्हाला मिळू शकेल.
या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.
वर्तमान पत्रातील बातमी पहा.