जालना जिल्हा पोलीस पाटील भरती 2025 – ऑनलाइन अर्ज, पात्रता व संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2025 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसंबंधी महत्त्वाच्या तारखा, पात्रता निकष, फी, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया खाली दिलेली आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण पोलीस पाटील भरतीसाठी तयारी करत आहेत.

तुम्ही जर जालना जिल्ह्यातील असाल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.

जालना जिल्हा पोलीस पाटील भरती 2025 संदर्भात या लेखामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या मधमाशी पालन प्रशिक्षण

भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

जालना जिल्हा पोलीस भरती संदर्भात खालील महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा जेणे करून तुम्हाला भविष्यामध्ये अडचण येणार नाही.

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 सप्टेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2025
  • अर्ज छाननी व पात्र/अपात्र यादी जाहीर – 1 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबर 2025
  • प्रवेशपत्र डाउनलोड – 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2025
  • लेखी परीक्षा दिनांक – 12 ऑक्टोबर 2025
  • निकाल जाहीर – 14 ऑक्टोबर 2025

अर्ज फी (Application Fee)

सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या भरतीसाठी कोणत्या प्रवर्गातील अर्जदारांसाठी किती फी असणार आहे. तर खालील प्रमाणे परीक्षा शुल्क पोलीस पाटील भरतीसाठी आकारण्यात आले आहेत.

  • खुला प्रवर्ग (Open Category): 800 रुपये.
  • आरक्षित व ईडब्ल्यूएस (Reserved / EWS): 600 रुपये.

शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

अर्जदाराची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणार आहे.

  • अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा.
  • वयोमर्यादा:
    • 25 वर्षांपेक्षा कमी नसावी.
    • 45 वर्षांपेक्षा जास्त नसावी (30/09/2025 रोजीच्या तारखेप्रमाणे विचार होईल).

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

पोलीस पाटील भरती 2025 ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी कागदपत्रे कोणकोणती लागतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे कारण ऐनवेळी त्यामुळे अर्जदाराला अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

  • अर्जदाराचे आधार कार्ड.
  • एसएससी उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
  • अधिवास प्रमाणपत्र.
  • जात प्रमाणपत्र.

वरील कागदपत्रे ऑनलाईन अर्ज सादर करतांना अपलोड करावी लागणार आहेत. खालील कागदपत्रे पडताळणीच्या वेळी आवश्यक असणार आहेत.

  • जातीचे प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गाकरिता).
  • लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र (जास्तीत जास्त 2 अपत्य).
  • निष्कलंक चारित्र्य प्रमाणपत्र.
  • शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र.
  • पूर्णवेळ नोकरी नसल्याचे ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र.

वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे तयार करून ठेवा.

परीक्षा पद्धत (Exam Pattern)

  • लेखी परीक्षा: 80 गुणांची
  • प्रश्नपत्रिका प्रकार: वस्तुनिष्ठ / बहुपर्यायी (MCQ)
  • अभ्यासक्रम:
    • सामान्य ज्ञान
    • गणित
    • स्थानिक परिसराची माहिती
    • चालू घडामोडी

👉 किमान पात्रता गुण:

  • लेखी परीक्षेत 36 गुण (45%) मिळाल्यास उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरेल.

विशेष अटी

  • उमेदवार ग्रामपंचायत सदस्य नसावा.
  • खाजगी / निमसरकारी संस्थेत पूर्णवेळ नोकरी करणारा नसावा.
  • मूळ प्रमाणपत्र तपासणी दरम्यान सादर करणे बंधनकारक.

अर्ज कसा करावा? (How to Apply)

पोलीस पाटील भरती 2025 ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने सादर करावा लगतो या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा जेणे करून अर्ज करतांना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

  1. अधिकृत भरती संकेतस्थळावर (Official Website) जा.
  2. “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
  3. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा (नाव, पत्ता, आधार, मोबाईल इ.).
  4. कागदपत्रांची स्कॅन प्रती अपलोड करा.
  5. अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने भरा.
  6. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट आउट काढा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत लिंक

लेखाचा सारांश

जालना जिल्हा पोलीस पाटील भरती 2025 ही स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. परीक्षेसाठी चांगली तयारी करावी

जालना पोलीस पाटील भरती 2025 साठी अर्ज कधी करायचा?

पोलीस पाटील भरती 2025 साठी जालना जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येईल. या कालावधीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करावा.

पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी उमेदवाराने किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीच्या पलीकडे जास्त शैक्षणिक पात्रता असेल तर उमेदवाराला स्पर्धेत अधिक फायदा होऊ शकतो, परंतु दहावी ही किमान शैक्षणिक अट आहे.

पोलीस पाटील भरती 2025 साठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनुसार म्हणजे 30 सप्टेंबर 2025 रोजी विचारात घेतले जाईल. त्या दिवशी अर्जदाराचे वय किमान 25 वर्षे असावे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे पर्यंतच असावे. या वयोमर्यादेबाहेरील उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अर्ज फी किती आहे?

भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराने अर्ज फी भरावी लागेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी ₹800 इतकी आहे. तर, आरक्षित प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी ही फी ₹600 ठेवण्यात आलेली आहे. फी ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.

पोलीस पाटील भरतीची परीक्षा कशी असेल?

पोलीस पाटील पदासाठी लेखी परीक्षा 80 गुणांची वस्तुनिष्ठ (Objective / MCQ) स्वरूपात घेतली जाईल. प्रश्नपत्रिका दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. विषयांमध्ये –
सामान्य ज्ञान
गणित
स्थानिक परिसराची माहिती
चालू घडामोडी
यांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण मिळेल.

किमान किती गुण मिळवणे आवश्यक आहे?

लेखी परीक्षेत किमान 36 गुण (म्हणजेच 45%) मिळवलेले उमेदवारच पुढील तोंडी परीक्षेस पात्र ठरतील. या टप्प्यात अपयशी ठरलेल्या उमेदवारांचा पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

प्रवेशपत्र (Hall Ticket) कधी उपलब्ध होईल?

पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2025 या कालावधीत उपलब्ध होईल. उमेदवाराने भरती संकेतस्थळावर जाऊन आपले User ID आणि Password वापरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल. प्रवेशपत्राशिवाय परीक्षेत प्रवेश मिळणार नाही.

निकाल कधी लागणार आहे?

पोलीस पाटील भरती 2025 च्या लेखी परीक्षेचा निकाल 14 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व तोंडी परीक्षा होऊन अंतिम निवड जाहीर केली जाईल.

अर्ज कसा करावा?

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. अधिकृत भरती संकेतस्थळावर (Official Website) जाऊन “Apply Online” या लिंकवर क्लिक करावे. अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, मोबाईल नंबर भरावा. नंतर आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी. अर्ज फी ऑनलाइन भरून फॉर्म सबमिट करावा. अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढणे आवश्यक आहे.

Leave a Comment