जालना जिल्ह्यासाठी झेरॉक्स मशीन अनुदान व इतर योजनांचे अनुदान जमा होणार 31 मार्च पर्यंत.
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. समाज कल्याण विभागाच्या वतीने देखील अशाच योजना राबविल्या होत्या.
ज्या अर्जदारांनी त्यांचे अर्ज सादर केले होते व त्यांचे अर्ज मंजूर झाले होते त्यांनी आता त्यांचे देयके ३१ मार्च २०२४ च्या आत सादर करण्यचे आवाहन जिल्हा परिषद जालना zilha parishad jalna यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय दिव्यांगसाठी शेष फंडातून शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या
झेरॉक्स मशीन,
मिनी पिठाची गिरणी,
5 एचपी विद्युत मोटार
या योजनांसहीत इतरही योजनांच्या लाभार्थीची निवड करण्यात आली आहे. ज्या लाभार्थींची या योजनांसाठी निवड झालेली आहे त्या लाभार्थींनी पंचायत समिती कार्यालयात जावून संबधित मशिनरीचे देयके सादर करावे. हि देयके सादर केल्यानंतर 31 मार्चपर्यंत त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने शेष फंडातून दिव्यांग तसेच मागासवर्गीयांसाठी 100% अनुदानावर विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
दिव्यांग लाभार्थी असेल तर त्यांच्यासाठी खालील योजना राबविल्या जातात
झेरॉक्स मशीन.
मिनी पिठाची गिरणी.
स्वयंचलित सायकल
इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी खालील प्रकारच्या योजना राबविल्या जातात.
मिरची कांडप.
झेरॉक्स मशीन.
मिनी पिठाची गिरणी.
शेतीसाठी तुषार संच.
5 एचपी विद्युत मोटार.
वरील ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी २०२३ या वर्षात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लाभार्थींची निवड करण्यात आली आहे.
झेरॉक्स मशीन अनुदान कोणत्या योजनेसाठी किती लाभार्थी
ज्या लाभार्थींनी या योजनेसाठी अर्ज सादर केले होते त्यामध्ये कोणत्या योजनेसाठी किती लाभार्थींची निवड करण्यात आली आहे ते खालीलप्रमाणे आहे.
दिव्यांगासाठी असलेल्या झेरॉक्स मशीन साठी 24 लाभार्थी
मिनी पिठाची गिरणी साठी 99 लाभार्थी
स्वयंचलित सायकलसाठी 14 लाभार्थीं
samaj kalyan yojana jalna 2022 कर्ज योजना अर्ज सुरु.
मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनेसाठी खालील प्रकारे निवड करण्यात आली आहे.
मिरची कांडप योजनेसाठी 163.
झेरॉक्स मशीनसाठी 48 लाभार्थी.
मिनी पिठाच्या गिरणीसाठी 66 लाभार्थी.
शेतकऱ्यांसाठी तुषार संचासाठी 64 लाभार्थी.
5 एचपी विद्युत मोटरसाठी 70 लाभार्थी.
वरीलप्रमाणे झेरॉक्स मशीन अनुदान व इतर योजनांसाठी अनुदान दिले जाणार आहे. आता जाणून घेवूयात यासाठी निवड कशी केली जाते.
वरील प्रमाणे लाभार्थींची निवड करण्यात आली आहे
ज्या अर्जदारांची वरील योजनेसाठी निवड झाली आहे त्यांनी वेळेत पंचायत समिती मार्फत त्यांची देयके सादर करून द्यावीत जेणे करून त्यांना 31 मार्च पर्यंत अनुदान मिळेल.
कशी होते योजनेसाठी निवड.
जिल्हा परिषद जालना समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीयांसहित दिव्यांग व्यक्तींसाठी सेस फंडातून विविध योजना राबविल्या जातात.
योजनांसाठी समाज कल्याण सल्लागार समितीची योजना ठरविणे आणि अर्ज मागणी बाबत बैठक होत असते. सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये लाभार्थींकडून अर्ज मागविले जातात.
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज पंचायत समितीकडे सादर करणे गरजेचे असते.
अर्ज प्राप्त झाल्यावर अर्जाची छाननी करून लाभार्थीची निवड केली जाते आणि मग लाभार्थींना योजनेचा लाभ दिला जातो.
तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचे देयक वेळेत सादर करून द्या जेणे करून तुम्हाला अनुदान लवकर मिळेल.